दुधाळ जनावारांसाठी पौष्टिक चाऱ्याविषयीची माहिती (Information on nutritious fodder for dairy cattle)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
दुधाळ जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी दैनंदिन आहारामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या एकदल व द्विदल हिरव्या चाऱ्याचा समावेश गरजेचा असतो. एकदल चाऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात, द्विदल चाऱ्यातून शरीर वाढीसाठी आवश्यक प्रथिनांचा पुरवठा होतो. द्विदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा द्विदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एसएनएफ वाढविण्यास मदत होते.
ज्वारी:
- ज्वारी हे एक महत्त्वाचे चारा पीक आहे.
- अवर्षणप्रवण भागात, हलक्या जमिनीत देखील तग धरून राहण्याची क्षमता असल्याने निश्चित चारा उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. ज्वारीचा कडबादेखील जनावरांना खाद्य म्हणून देता येतो.
- ज्वारीच्या चाऱ्याकरिता विकसित केलेल्या जाती सुमारे 3 ते 4 मीटर उंच वाढतात. त्याची ताटे हिरवीगार, पालेदार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
- ज्वारीच्या चाऱ्यात 8 ते 10 टक्के प्रथिने असतात.
- या पिकांसाठी मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन लागते. पूर्वमशागतीच्या वेळी एकरी 2 टन भरखत म्हणून शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
- ऑक्टोबर महिन्यात पेरणी पूर्ण करावी. पेरणीसाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी 35-1, फुले गोधन या जातींची 30 सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी.
- पिकाची वाढ झपाट्याने होत असल्याने सुरुवातीला पहिली खुरपणी लवकर करून शेत तणविरहित ठेवावे.
- 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी) असताना पिकाची कापणी करावी.
- हिरव्या चाऱ्याचे प्रति एकरी 220 क्विंटल उत्पादन मिळते.
मका:
- मका हे जलद गतीने वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम, पौष्टिक तसेच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारे चारा पीक आहे.
- मक्याच्या चाऱ्यापासून उत्तम दर्जाचा मुरघास तयार करता येतो.
- हिरव्या चाऱ्यात 9 ते 11 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
- लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन निवडावी. एक नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत एकरी 2 टन शेणखत मिसळावे.
- पेरणीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-2, विजय या जातींची निवड करावी.
- पेरणीसाठी एकरी 30 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची बीज प्रकिया करावी.
- नोव्हेंबर महिन्यात पाभरीने 30 सेंमी अंतरावर पेरणी करावी.
- पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात एक कोळपणी आणि एक खुरपणी करावी.
- पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी) असताना पिकाची कापणी करावी.
- हिरव्या चाऱ्याचे प्रति एकरी 240 क्विंटल उत्पादन मिळते.
तुम्ही तुमच्या दुधाळ जनवारांसाठी कोणता पौष्टिक चारा वापरता? त्याची लागवड कशी करता व किती उत्पादन मिळते? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. दुधाळ जनावरांच्या आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी कोणत्या चाऱ्याचा समावेश गरजेचा असतो?
दुधाळ जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी दैनंदिन आहारामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या एकदल व द्विदल हिरव्या चाऱ्याचा समावेश गरजेचा असतो.
2. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त म्हशी कोणत्या?
महाराष्ट्रातील पूर्णाथडी, पंढरपुरी, मराठवाडी, नागपुरी यासह मुहा, मेहसाणा, सुरती, जाफराबादी या मान्यताप्राप्त म्हशी आहेत.
3. एकदल चाऱ्यामध्ये कोणत्या पोषक पदार्थांचा समावेश असतो?
एकदल चाऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor