जाणून घेऊयात क्लायमेट स्मार्ट गायींविषयी
नमस्कार पशुपालकांनो,
हवामान-स्मार्ट पशुधन उत्पादन म्हणजे काय याची FAO एक छान व्याख्या केली आहे ती म्हणजे जे 'शाश्वतपणे उत्पादकता वाढवते, लवचिकता वाढवते, हरितगृह वायू कमी करते/काढते आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि विकास उद्दिष्टे साध्य करते' ते म्हणजे हवामान-स्मार्ट पशुधन उत्पादन.
FAO आणि इतरांनी असा अंदाज लावला आहे की पशुधन क्षेत्र 1 अब्जाहून अधिक लोकांना समर्थन देते. जागतिक कृषी सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) 40% वाटा पशुधन क्षेत्राचा आहे.
आता जाणून घ्या अशा काही क्लायमेट स्मार्ट गायींविषयी:
दूध उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध अशा होलस्टिन आणि जर्सी यांच्या संकरातून अनेक जातींचा विकास करण्यात आला आहे. मात्र या अधिक दूध देणाऱ्या जाती उष्णता आणि दुष्काळासाठी तितक्या सहनशील नाहीत. त्याचा फटका उष्ण कटिबंधीय देशामधील पशुपालकांना नेहमी बसतो. अशा स्थितीमध्ये टांझानिया येथील उष्णता, दुष्काळ आणि रोग प्रतिकारक अशा स्थानिक गायीच्या जातीशी संकर करण्यात आला. पाच पिढ्यांपर्यंत संकर केल्यानंतर सामान्य व्यवस्थापनामध्ये हीच गाय प्रति दिन १० लिटर इतके देण्याची क्षमता तयार झाली. पूर्वी ही गाय केवळ अर्धा लिटर दूध प्रति दिन देत असे. अशा प्रकारचे इतर अनेक प्रयोग पशुधनाच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या देशात सुरु आहेत.
आता जाणून घेऊया पशुधनाला हवामान स्मार्ट करण्यासाठी काय करता येईल याविषयी:
- अधिक उत्पादक जनावरांची पैदास
- आहारातील सुधार जेणेकरून प्राणी कमी खाद्य आणि उत्सर्जनासह अधिक प्रथिने तयार करतील
- उत्तम खत व्यवस्थापन
- उत्पादन सुधारण्यासाठी उत्तम कळप व्यवस्थापन, उत्तम कळप आरोग्य व्यवस्थापनासह प्रतिजैविकांवरचा कमी अवलंब
- गवताळ प्रदेशांचे उत्तम व्यवस्थापन
क्लायमेट स्मार्ट गायींविषयी तुम्हाला असलेली माहिती आपल्या इतर पशु पालकांसह देखील शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor