जाणून घ्या, प्रधानमंत्री कृषी सिंचन (प्रती थेंब, अधिक पिक) योजनेविषयीची माहिती

नमस्कार शेतकरी बंधू/भगिनींनो,
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी सरकारने जलसिंचनाची सूक्ष्म सिंचन योजना राबवली आहे. जेणेकरून कमी पाण्यात सुद्धा शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता येईल.
पिकांच्या झाडाच्या मुळाशी थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60 टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.
तुषार सिंचन हे एक असे साधन आहे जे शेती, पिके, लॉन्स, गोल्फ खेळाच्या जागी आणि इतर भागात फवारणी पद्धतीने सिंचन करण्यासाठी वापरले जाते. हे साधन जागा थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरले जाते. तुषार सिंचन हा पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे. जेव्हा पंपाच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून ते बाहेर पडते आणि पिकावर शिंपडले जाते.
या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 % तर इतर शेतकऱ्यांना 45 % इतके अनुदान दिले जाईल.
आता जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता.
-
तर मंडळी पहिले म्हणजे शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
-
शेतकऱ्याकडे 7/12 प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
-
शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
-
जर लाभार्थ्याने 2016-17 च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील 10 वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने 2017-18 च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील 7 वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
-
शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचा विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलाची ताजी प्रत सादर करावी लागेल.
-
सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
-
शेतकऱ्यांना 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
-
शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
-
7/12 प्रमाणपत्र
-
8-अ प्रमाणपत्र
-
वीज बिल
-
खरेदी केलेल्या संचाचे बिल
-
पूर्वसंमती पत्र
संचाच्या मापदंडांविषयी माहितीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/PDF/Benefit_PradhanMantriKrishiSinchayeeYojana_PerDropMoreCrop.pdf येथे क्लिक करा.
-
अधिक माहितीसाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या आणि पात्र असल्यास या योजनेचा अवश्य लाभ घ्या.
-
एक शेतकरी एक डीपी योजनेविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी https://dehaat-kisan.app.link/vDPhBJoE7zb हे वाचा.
-
योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा अथवा महाडीबीटी पोर्टलच्या 022- 49150800 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा.
-
शेतीशी संबंधित महत्वपूर्ण माहितीसाठी अॅप्लिकेशनल भेट देत रहा तसेच इतर शेतकरी मित्रांसोबत माहिती शेयर करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
