तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
2 May
Follow

जनावरांच्या निवास स्थानाचे व्यवस्थापन करताना या गोष्टी ठेवा लक्षात (Janavaranchya Nivas sthanache management)

नमस्कार पशुपालकांनो,

भारतातील अनेक भागात पशुपालन हे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. या व्यवसायात सहभागी होऊन शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी शासनाने पशु आवास योजनाही सुरू केली आहे. या अंतर्गत पशुपालकांना गोरक्षणासाठी जमिनीपासून इतर अनेक व्यवस्थांसाठी अनुदान दिले जाते. पशुपालन व्यवसायात येण्यापूर्वी जनावरांच्या राहण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांचे निवासस्थान ज्याला सामान्यतः गोशाळा किंवा गोठा असे म्हणतात, ते जितके हवेशीर आणि आरामदायी असेल तितके जनावरांचे आरोग्य चांगले राहील. ज्याचा थेट परिणाम दूध उत्पादन आणि जनावरांच्या पुनरुत्पादनाच्या वाढीवर होतो. जनावरांचे निवासस्थान  बांधताना आपल्याला अनेक बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेल्या पशुपालन या क्षेत्राकडे लोक व्यवसाय म्हणून बघू लागलेत. व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास पशुपालनात आहार (feed) आणि गोठा (shed) व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग आता जाणून घेऊया जनावरांच्या निवास स्थानाचे व्यवस्थापन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टींविषयी.

जनावरांच्या गोठ्याचे प्रकार, त्याचे आकारमान शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे, स्थानिक परिस्थितीनुसार बदलत असते. आता जाणून घेऊया कसा असावा जनावरांचा आहार याविषयी:

  • सर्वात पहिले तर जनावरांचा गोठा मोकळा आणि कोरडा असला पाहिजे.
  • गोठा नेहमी काहीशा उंचीवरच्या सपाट जमिनीवर असला पाहिजे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल.
  • गोठा मुरमाड, पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीत असल्यास जनावरांच्या मलमुत्राचीही योग्य विल्हेवाट लावता येईल.

गोठ्यासाठी जमीन:

  • प्रत्येक गाईसाठी 7 मीटर चौरस खुले क्षेत्र आणि 3.5 मीटर चौरस बंद किंवा झाकलेले क्षेत्र आवश्यक असते.
  • प्रत्येक म्हैशीसाठी 8 मीटर चौरस खुले क्षेत्र आणि 4 मीटर चौरस झाकलेले किंवा बंद क्षेत्र आवश्यक असते.
  • मध्यम आणि जास्त पाऊस असलेल्या भागात शेडची उंची 175 सेमी ठेवावी.
  • कमी पाऊस आणि कोरड्या भागात शेडची उंची 220 सेमी ठेवावी.
  • जनावरांसाठी अन्न व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी.

जनावरांच्या गोठ्याचे मुख्यतः तीन प्रकार आहेत:

  • आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा
  • अर्धबंदिस्त गोठा
  • मुक्त संचार गोठा

आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा:

  • आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा पूर्णतः बंदिस्त असतो यामध्ये नवीन टेक्नॉलॉजिचा वापर करतात.
  • जसे की दूध काढणी यंत्र, जनावरांना धुण्यासाठी मशीन, वातावरण कुल करण्यासाठी विविध फोगरचा वापर.
  • हा गोठा पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला असतो.
  • या गोठ्यामुळे जनावरांची पूर्णतः सुरक्षा होते तसेच वन्य प्राण्यापासून कोणताही धोका राहत नाही.
  • या गोठ्यामुळे जनावरांवर वेळोवेळी लक्ष ठेवता येतो व योग्य पद्धतीने चारा नियोजन व पाण्याचे व्यवस्थापन करता येते.
  • प्रत्येक जनावराकडे जातीने लक्ष देता येते त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपता येतात.
  • मोठ्या डेअरी फार्मिंग मध्ये हा गोठा खूप फायदेशीर ठरतो.
  • यामध्ये गुरे संपूर्ण काळ बांधून असतात त्यांना मोकळे सोडले जात नाही तसेच अनुकूल जातींची निवड केली जाते.

अर्धबंदिस्त गोठा:

  • अर्धबंदिस्त गोठ्यामध्ये गुरांसाठी शेड बांधले जाते त्याबरोबरच त्यांना काही काळ मोकळे सोडले जाते या पद्धतीला अर्धबंदिस्त गोठा पद्धत म्हणतात.
  • बंदिस्त गोठ्यावरील होणारा जास्तीचा खर्च टाळण्यासाठी अर्धबंदिस्त गोठा बांधला जातो.
  • अर्धबंदिस्त गोठ्यात जनावरे खाण्यापुरती शेडमध्ये असतात व खाणे झाल्यानंतर त्यांना मोकळे सोडले जाते.
  • यामध्ये सर्व जनावरे मिक्स असल्या कारणाने रेतन करण्यासाठी फायदेशीर ठरते.
  • अर्धबंदिस्त गोठ्यासाठी जास्त जागेचा वापर होतो.

मुक्त संचार गोठा:

  • मुक्त संचार गोठ्यामध्ये गुरांना पूर्णपणे मुक्त सोडले जाते.
  • मुक्त संचार गोठ्याचा मुख्य फायदा असा होतो की कन्स्ट्रक्शन वरील खर्च पूर्णतः कमी होतो.
  • या गोठ्यामध्ये जनावरांना एक मोठे कंपाउंड बांधून त्यामध्ये पाण्याची व चाऱ्याची सोय केली जाते.
  • गुरे जेव्हा वाटेल तेव्हा चारा खातात व जेव्हा वाटेल तेव्हा पाणी पितात यामुळे दूध उत्पादन वाढल्याचे दिसून येते.
  • यामध्ये मजुरांवरील खर्च बऱ्याच प्रमाणात कमी होतो त्यामुळे ज्यांना मजुरांची टंचाई आहे ते या पद्धतीचा वापर करू शकता.

जनावरांच्या अधिवासाचे व्यवस्थापन करताना ठेवा या गोष्टी लक्षात:

  • गोठा बांधताना सर्वप्रथम जागा निवडणे आवश्यक आहे.
  • थोड्या उंचीवर जनावरांचे निवासस्थान तयार करा. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या उद्भवणार नाही.
  • नियमित साफसफाईचीही सोय करा.
  • गोठ्यासाठी पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. त्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल आणि गोठ्यातील मजलेही कोरडे राहतील.
  • तसेच जनावरांच्या निवासात हवेच्या संचारासाठी योग्य व्यवस्था करा. यासोबतच वीज आणि पाण्याचीही योग्य व्यवस्था असावी.
  • पशू निवासगृहात स्वच्छता राखण्यासाठी, शेण, मूत्र, जनावरांच्या निवाऱ्यात बनवलेले नाले इ. नियमितपणे स्वच्छ करा.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. तुम्ही तुमच्या जनावरांच्या निवास स्थानाचे व्यवस्थापन कसे करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions)

1. जनावरांच्या गोठ्याचे प्रकार किती व कोणते?

जनावरांचे गोठे तीन प्रकारचे असतात. आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा, अर्धबंदिस्त गोठा आणि मुक्त संचार गोठा.

2. जनावरांच्या गोठ्याचा मुख्य उद्देश काय?

जनावरांच्या गोठ्याचा मुख्य उद्देश ऊन, वारा आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण करणे होय.

3. आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा म्हणजे काय?

आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा पूर्णतः बंदिस्त असतो यामध्ये नवीन टेक्नॉलॉजिचा वापर करतात.

35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor