जनावरांच्या पोटातील जंत ठरू शकतात दूध उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण

नमस्कार मंडळी,
आपल्याला माहीतच असेल की, दुभत्या जनावरांच्या पोटात जंत असल्याने त्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. अस्वच्छ आणि संसर्गजन्य अन्नाचे सेवन हे जनावरांच्या पोटात जंत होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. हे अंतर्गत परोपजीवी जंत जनावरांच्या अन्नासह जनावरांचे रक्त ही शोषून घेतात. त्यामुळे हळूहळू जनावरांचे आरोग्य बिघडू लागते. अशा परिस्थितीत जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे अंतर्गत परोपजीवी जंतांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.
पोटातील जंतांमुळे त्रासलेल्या जनावरांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास, बाधित जनावरांच्या दुर्गंधीयुक्त शेणातही जंत दिसू शकतात. जेव्हा समस्या जास्त असते तेव्हा जनावरांना पोटदुखी, पचनामध्ये अडचण यांसह अतिसार आणि पोट फुगण्याची देखील तक्रार असते. भूक व तहान न लागल्याने अनेक वेळा प्राणी आपले खाणेपिणे कमी करतात. लहान जनावरांच्या पोटात जंत असल्याने त्यांचे वजन वाढत नाही आणि शारीरिक विकासातही अडथळा येतो.
आता जाणून घेऊया, पोटातील जंतांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा. तर मंडळी, वर्षातून किमान दोनदा जंतनाशक औषध जनावरांना द्यावे. लहान जनावरांना 3 महिन्यांच्या अंतराने आणि प्रौढ जनावरांना 4 महिन्यांच्या अंतराने जंतनाशक द्यावे. तसेच घरगुती उपाय म्हणून जनावरांच्या आहारात कडुलिंबाच्या पानांचा समावेश करा. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच जंतनाशक वापरावे.
जंतनाशकाचा वापर करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवणे विसरू नका. पहिले म्हणजे रिकाम्या पोटी जनावरांना अँथेलमिंटिक देणे अधिक फायदेशीर ठरते. व दुसरे आणि महत्वाचे म्हणजे अँथेलमिंटिक औषध दिल्यानंतर सुमारे 2 तास जनावरांना अन्न देणे टाळा.
या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या जनावरांचे चांगले आरोग्य सुनिश्चित करू शकता आणि जंतनाशकाचा वापर करून दूध उत्पादन देखील वाढवू शकता. प्राण्यांचे आरोग्य आणि आहार यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून पशुवैद्यांचा मोफत सल्ला देखील मिळवू शकता.
- जनावरांच्या पोटातील जंतांना नियंत्रित करण्या संबंधित करावयाच्या उपाययोजनांबद्दल काही प्रश्न पडले असल्यास आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा.
- पशुपालनाशी संबंधित इतर रंजक आणि महत्वपूर्ण माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
