जनावरांसाठी मुरघास कसा तयार कराल?

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
बऱ्याच ठिकाणी उन्हाळी हंगामात पाण्याच्या अभावी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे तेथील शेतकरी पावसाळी हंगामतच हिरव्या चाऱ्यावरती विशिष्ट प्रक्रिया करून एका बॅगमध्ये किंवा खड्यामध्ये चारा हवाबद्ध करून साठवतात व आपत्कालीन काळात तोच चारा हिरव्या चाऱ्याला उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो यालाच आपण मुरघास असे म्हणतो. इंग्रजी मध्ये यालाच सायलेज देखील म्हणतात. सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर मुरघास म्हणजे "मुरलेला चारा". आजच्या या लेखात आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणारा हा चार बनवायचा कसा याविषयी जाणून घेणार आहोत.
मुरघास तयार करण्यासाठी कोणती पिके वापरावी?
मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके;
तसेच द्विदल पिके - जसे की लसूण, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर करावा.
1. यामध्ये मका पीक हे दुधाळ अवस्थेमध्ये कापून घ्यावे.
2. ज्वारी हे पीक फुलोरा अवस्थेमध्ये कापावे.
3. डाळ वर्गीय चारा देखील फुलोरा अवस्थेमध्ये कापावा.
4. डाळवर्गीय पिके - 40% व तृणवर्गीय पिके ही 60% वापरावीत.
मुरघास बनवण्याची सामग्री:
1. चारा पिके (एकदल आणि द्विदल पिके प्रमाण - 4:1)
2. 500 जीएसएमची मुरघास
3. एकदल पिकांसाठी - 1 किलो शिफारशीत फिडग्रेड यूरिया + 100 लीटर पानी / 200 किलो चाऱ्यासाठी
4. द्विदल पिकांसाठी - 4 किलो गूळ + 100 लीटर पानी / 200 किलो चाऱ्यासाठी
5. चारा कुट्टी मशीन
मुरघास बनविण्याचे प्रकार:
- बॅगेतील मुरघास
- खड्ड्यातील मुरघास
- बांधकामातील मुरघास
मुरघास बनविण्याची प्रक्रिया:
- मका व ज्वारी सारखी चारापिके 75-80 दिवसात कापणीला येतात. चारापिके त्यांच्या चिकाच्या किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत आली की कापावीत.
- मुरघास बनविताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण 60 ते 65 टक्के असावे. त्यापेक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून पीक कापणी नंतर थोड्यावेळासाठी चारा सुकू द्यावा.
- त्यानंतर कुट्टी मशीन च्या साह्याने चाऱ्याचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून न ठेवता त्वरित बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकाम केलेल्या जागी आणून टाकावी.
- कुट्टी टाकल्यानंतर ती पसरवावी. धुमश्याने किंवा पायाने अथवा ट्रॅक्टरने तुडवावी. यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते. व कुट्टी दाबून बसते. कडांवरची कुट्टी विशेषतः चांगली दाबून घ्यावी.
- एकावर एक चाऱ्याचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे हिरवा चारा हवाबंद होतो.
- त्यानंतर प्लॅस्टिक आच्छादनावर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- एक चौरस फूट जागेत 15 ते 16 किलो चारा तयार होतो. म्हणून त्यानुसार गरज ओळखून खड्डे किंवा बांधकाम केले जावे.
- मुरघास बनविताना प्रत्येक थरावर काही जिवाणू असलेले द्रावण, मीठ फवारले जाते. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो, मुरघास लवकर तयार होतो. बुरशीही लागत नाही.
- बहुतेक वेळा या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मुरघास तयार करताना अपयश येते. त्यामुळे पहिल्या वेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये. प्रायोगिक तत्वावर मुरघास करून पाहावा. शिकून घ्यावे. शक्य असल्यास जिवाणूंचे द्रावण फवारावे. त्यामुळे चार खराब होण्याची शक्यता कमी होते. पहिल्याच प्रयत्नात चांगला मुरघास तयार होतो.
- आपण चारा हवाबंद केल्यानंतर त्यामध्ये राहिलेल्या हवेतील प्राणवायूचे श्वसन हिरव्या चाऱ्यामुळे होते. हवाबंद झाल्याने बुरशी लागत नाही. बुरशीला प्राणवायू मिळत नाही व जिवाणूंमार्फत लॅक्टिक ऍसिडची निर्मिती झाल्यामुळे चारा टिकून राहतो.
- मशीन द्वारे देखील तुम्ही मुरघास बनवू शकता.
तुम्ही तुमच्या जनावरांसाठी मुरघास बनविता का? तो कसा बनविता हे इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही देखील तुमच्या जनावरांसाठी मुरघास बनवू शकाल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
