ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
जरबेरा फुलांचे दर पडले; कोल्हापुरातील २०० ग्रीनहाउस शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

बाजारातील प्लॅस्टिक फुलांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे नैसर्गीक फूल शेती उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जरबेराच्या १ फुलाचा उत्पादन खर्च २ रुपये असताना दर मात्र १ रुपया मिळत आहे. यामुळे ग्रीनहाउस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २०० शेतकरी आधुनिक हायटेक ग्रीनहाउस शेती करतात. कोरोनामुळे फूल शेती बंद पडली होती. यानंतर २ वर्षांत पुन्हा फुलांची मागणी वाढल्याने दरातही तेजी दिसून आली. मात्र, सध्या जरबेरासह गुलाबाचेही दर पडले आहेत. प्रदूषणाला भर घालणाऱ्या चायना, आर्टिफिशियल प्लॅस्टिक फुलांना मागणी वाढली आहे. कार्यक्रमात प्लास्टिक फुलांचा वापर केला जातो. यामुळे नैसर्गिक फुलांचे महत्व कमी होत आहे.
19 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
