कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारांनी शेतकऱ्यांचा गौरव
शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या शेतकऱ्यांची राज्य शासनाने दखल घेतली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील सहा शेतकरी या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये देविदास विश्वनाथ धोत्रे (रा. विवरा, ता. पातूर) यांना सन 2020 वर्षासाठी कृषिभूषण (सेंद्रिय शेती) म्हणून निवडण्यात आले आहे. सचिन गजाननराव कोरडे (रा. हिंगणी, ता. तेल्हारा) यांना 2020 च्या उद्यानपंडित पुरस्कारासाठी निवडले गेले. तर अमोल बळिराम नेमाडे (रा. रायखेड, ता. तेल्हारा) यांना सन 2020 साठी वसंतराव नाईक शेतिनिष्ठ, दिलीप गुलाबराव ठाकरे (रा. मालवाडा, ता. बाळापूर) यांना सन 2021 साठी शेतिनिष्ठ शेतकरी तर राजेश विठ्ठल चोपडे (रा. माटोडा, ता. मूर्तिजापूर) यांची सन 2022 सालाच्या वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवडण्यात आले. ज्ञानेश्वर शेषराव ढोरे (रा. महागाव, ता. बार्शीटाकळी) यांची सन 2022 वर्षात युवा शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी कर्मचारी गटात मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले विलास चव्हाण यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सेवारत्न पुरस्कार 2022 मिळाला. या शेतकऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor