ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 June
Follow
कृषी विभागाची मोठी कारवाई, बोगस खते, बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द
सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तर आडसाली उसाची लागण केलेल्या शेतकऱ्यांची खते टाकण्यासाठी गडबड सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान खरिपासाठी मोठ्या प्रमाणात बियाणांची विक्री होत आहे परंतु शेतकऱ्यांना मुदतबाह्य खते-औषधे, बियाणांची विक्री, लिंकिंगचा आग्रह, खते असूनही नाही म्हणून सांगण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्यातील १५ खत दुकानांचा परवाना कायमचा रद्द केला असून दोघांचा परवाना निलंबित केला आहे. राज्यभरातून कृषी विभागाने जूनअखेर बियाणे, खते व कीटकनाशकांचा २५५ मेट्रिक टन साठा जप्त करण्यात केला असून त्याची अंदाजे किंमत अडीच कोटींपर्यंत आहे.
55 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor