कांदा पिकातील खत व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
महाराष्ट्रातील अंदाजे 1.00 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्हयात घेतले जाते. आज आपण याच भरघोस उत्पादन आणि उत्पन्न देणाऱ्या कांद्याच्या खत व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
कांदा लागवडीच्या आधी 1 दिवस करावयाचे खत व्यवस्थापन (बेसल डोस) : सर्व खते मिक्स करून मातीमध्ये मिसळावीत किंवा बेड वर लागवड करणार असल्यास बेड भरून घ्यावेत.
- डी.ए.पी. - 50 किलो प्रति एकर
- एम.ओ.पी. (पोटाश) - 50 किलो प्रति एकर
- सल्फर - 8 किलो प्रति एकर
- मायक्रोनुट्रीएंट खत - 10 किलो प्रति एकर
- देहात स्टार्टर - 4 किलो
लागवडीनंतर 15 दिवसांनी ड्रीपद्वारे किंवा पाटपाण्याने रोपांच्या मुळांच्या विकासासाठी आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी करावयाचे खत व्यवस्थापन:
- 19:19:19 (देहात न्यूट्री एनपीके) - 2 किलो प्रति एकर
- ह्यूमिक एसिड (देहात पंच) - 1 किलो प्रति एकर
लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी दोन्ही खते प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 19:19:19 (देहात न्यूट्री एनपीके) - 50 ग्राम
- न्यूट्री वन बूस्ट मास्टर - 30 मिली
लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 12:61:00 (देहात न्यूट्री एमएपी) - 70 ग्रॅम
- चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट - 15 ग्रॅम
लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 13:00:45 (देहात न्यूट्री केएनओ3) - 75 ग्राम
- न्यूट्री कॅल्शिअम नायट्रेट विथ बोरॉन - 75 ग्राम
- लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 00:52:34 (देहात न्यूट्री एमकेपी) - 75 ग्रॅम
- न्यूट्री वन बोरॉन 20% - 15 ग्रॅम
- समुद्री शेवाळ अर्क - 15 ग्रॅम
लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:
- 00:00:50 - 75 ग्रॅम
- चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट - 15 ग्रॅम
वरील सर्व खते देताना अमलात आणायच्या महत्त्वाच्या गोष्टी -
- वरील खतांचा डोस मातीपरीक्षां आवहालानुसार बदलू शकतो.
- फवारणी करताना प्रत्येक वेळी स्टिकरचा वापर करावा.
- फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे.
- नमूद केलेली खते जास्त प्रमाणात देऊ नये.
- पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
- फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि खत मिसळताना कृषी तंज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.
तुम्ही कांदा पिकात खत व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
