तपशील
ऐका
रोग
कांदा
कृषी ज्ञान
DeHaat Channel
13 Dec
Follow

कांदा पिकातील करपा रोग व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, धुळे, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच मराठवाडा व विदर्भातील काही भागात कांद्याची लागवड केली जाते. बाजारात वर्षभर कांद्याला चांगली मागणी असते. प्रतिकूल हवामानात कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे सुमारे 50 ते 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. म्हणूनच आजच्या या भागात आपण कांदा पिकातील करपा रोग व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

1) काळा करपा: (ॲन्थ्रॅक्नोज)

रोगकारक बुरशी: कोलीटोट्रायकम ग्लेओस्पोराइड्‌स

लक्षणे:

  • सुरूवातीला पानाची बाह्य बाजू व देठाजवळ राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात.
  • पाने वाळतात. रोपाची मान लांबट होऊन पात वेडीवाकडी होते. पाने वेडीवाकडी झाल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.
  • रोपांची पाने ही काळी पडून वाळतात. नंतर रोप मरते.
  • दमट आणि उबदार हवामानात रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते.
  • कुजलेल्या रोपाचा भाग, रोपवाटिकेतील रोप आणि कांदा या मार्फत हा रोग पसरतो.

2) तपकिरी करपा:

रोगकारक बुरशी: स्टेमफीलीयम व्हेसिकॅरीयम

लक्षणे:

  • रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर होतो.
  • पानाच्या बाहेरील भागावर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
  • फुलांच्या दांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन वाकून मोडतात.

3) जांभळा करपा:

रोगकारक बुरशी: अल्टरनेरिया पोराय

लक्षणे:

  • पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपवाटिका तसेच बीजोत्पादनाची लागवड तसेच रांगड्या कांद्यावरही या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • सुरुवातीस पानावर लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मध्यभाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात.
  • फुलांचे दांडे मऊ पडून वाकतात किंवा मोडून पडतात.

नियंत्रणाचे उपाय (प्रतिलिटर पाणी):

  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूजी (देहात:DEM-45) 3 ग्रॅम किंवा
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (इफको-यामाटो) 1 ग्रॅम किंवा
  • हेक्झाकोनॅझोल 5% इसी (टाटारॅलिस-कॉन्टाफ) 1 मिलि किंवा
  • क्लोरोथॅलोनील 75% WP (सिजेंटा-कवच) 2.5 ग्रॅम किंवा
  • क्लोरोथॅलोनील 75% WP (सिजेंटा-कवच) 2.5 ग्रॅम + स्टिकर किंवा
  • पाइराक्लोस्ट्रोबिन 5% + मेतिराम 55% (पीआय इंडस्ट्रीज-क्लच) (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम फवारणी करावी.
  • 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
  • पिकांची फेरपालट करावी.

तुमच्या कांद्याच्या पिकात वरील पैकी कोणता करपा रोग झालेला? तुम्ही कशाप्रकारे नियंत्रण मिळवले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. आणि हो कांदा पिकातील एन-एर्जीच्या फायद्यांविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/iewP7RLUsFb हे नक्की वाचा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor