ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Jan
Follow
कांद्याला मिळेना उत्पादन खर्चाएवढाही भाव
पुणे: आळेफाटा परिसरात पहिल्या टप्प्यात लागवड झालेल्या कांद्याच्या काढणीला सुरुवात झालेली दिसुन येत आहे. साधारणपणे संप्टेंबर,ऑक्टोंबर महिन्यात लावलेला कांद्या काढणीला आला असुन, आळेफाटा परिसरातील आळे,राजुरी,वडगाव आनंद,बोरी बुद्रूक,बोरी खुर्द,कोळवाडी ,संतवाडी ,उंचखडक,वडगाव कांदळी या गावांमधील शेतकरी सध्या कांदा काढताना दिसुन येत आहे. कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला 5 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळत असून यामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. इंधनाचे भरमसाठ वाढलेले दर , मजुरी ,मशागत या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
29 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor