तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कांद्यानंतर कापसाच्या दरालाही लागले ग्रहण! हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

मागच्या एका आठवड्यात कांद्याच्या दराने मान टाकली आहे, त्यानंतर कापसाचे दरही 7 हजारांच्या खाली आले असून हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात आहे. दरम्यान, कापसाचे दर वाढण्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी सोडली आहे. केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला 7 हजार 20 रूपये प्रतिक्विंटल एवढा दर निश्चित केलेला असतानाही आज राज्यातील केवळ तीन बाजार समित्यांमध्ये 7 हजारांच्या वर दर मिळाला. तर एका बाजार समितीमध्ये केवळ 5 हजार 600 दर मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर वाढण्यासंदर्भातील अनुकूल परिस्थिती असतानाही कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.



58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor