तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

काजू उत्पादकांवर दुहेरी संकट ! करपलेला मोहर आणि कीड प्रादुर्भावाने नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूला दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहर पूर्णतः करपला आहे. वाढलेल्या तापमानाचा हा परिणाम मानला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोहर करपल्याने उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. लांबलेल्या पावसामुळे यावर्षी काजू हंगाम विलंबाने सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मोहर डिसेंबरमध्ये आला. या मोहराला झालेल्या फळधारणेचे उत्पादन सुरू आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात काजू कलमांना मोहर आला होता. मोहराने झाडे बहरून गेली होती. त्यामुळे काजू उत्पादकांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हांचा चटका बसू लागला.


54 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor