तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि जिनींग व्यावसायिक हस्तक्षेप करून कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. चांगला कापूस जिनिंगवाले खरेदी करतात आणि खराब कापूस 'सीसीआय'कडे ढकलला जातो, अशी कबुली पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत सोमवारी (ता. १७) प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. 'सीसीआय' मार्फत कापूस खरेदी करण्यासाठी विकसित केलेली प्रणाली अधिक पारदर्शी करण्यात येईल, तसेच कापूस खरेदीसाठी नोंदणीस मुदतवाढ देण्याबरोबरच जोपर्यंत कापूस खरेदी संपत नाही तोपर्यंत केंद्र बंद करण्यात येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor