तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

केळीचे दर वाढले, उत्पादनात दोन महिन्याचा खंड पडण्याची ही पहिलीच वेळ

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यानच्या लागवडीखालील केळीबागा उपलब्ध नसल्याने गत दीड- दोन महिन्यांपासून केळी उत्पादनात खंड पडला आहे. रावेर तालुक्याच्या इतिहासातील हा दुर्मीळ काळ असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. रावेर व ब-हाणपूर केळी बाजारपेठेत 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा तेजीचा भाव असला तरी, केळी उपलब्धत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना हा जणू कोरडाच दिलासा ठरत आहे.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor