तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
1 year
Follow

खरीप पीक विमा योजना 2023-24 साठी लवकर करा अर्ज

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सरकारकडून विमा मिळतो. प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत दुष्काळ, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहे. इतर कोणत्याही कारणांमुळे पिकाचे नुकसान झाले तर, विम्याची रक्कम दिली जात नाही. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना खरीप पिकाच्या 2% आणि रब्बी पिकाच्या 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% रक्कम विमा कंपनीला द्यावी लागते. आजच्या लेखात आपण खरीप हंगामासाठी महत्वाच्या अशा खरीप पीक विमा 2023-24 या योजनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022-23 योजनेत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत मुदत आहे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रासाठी अधिसूचित पिकांसाठी राबवली जाणार आहे. देशातील सर्वच शेतकरी खरीप पीक विमा 2023 साठी पात्र आहेत.

पीक विमा योजनेत समाविष्ट असणारी पिके आणि शेतकरी

या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. ही योजना राज्यात शासनाने खरीप आणि रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ/ मंडळ गट/ तालुकास्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येईल.

पीक वर्गवारी

खरीप हंगाम

रब्बी हंगाम

तृणधान्य व कडधान्य पिके

भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका

गहू (बागायत), रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात

गळित धान्य पिके

भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन

उन्हाळी भुईमूग

नगदी पिके

कापूस, खरीप कांदा

रब्बी कांदा

राज्यात अधिसूचित क्षेत्रासाठी खरीप हंगामातील भात व उन्हाळी भात पीक अधिसूचित करण्यात आलेले आहे.. यासाठी उंबरठा उत्पादन व चालू वर्षाचे सरासरी उत्पादन हे तांदूळ गृहीत धरू निश्चित केले आहे.


खरीप पीक विमा 2023 साठी आवश्यक कागदपत्र

  • 7/12 उतारा

  • 8 अ

  • पिकपेरा घोषणापत्र

  • बँक खाते पासबूकची झेरॉक्स

  • आधार कार्ड

  • पीक विमा महितीचा अर्ज

  • पीक विमा प्रीमिअम शुल्क

  • चालू स्थितीत असलेला मोबाइल क्रमांक

पीक विमा 2023 साठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा

शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर खरीप पीक विमा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील ठिकाणाहून तो अर्ज करू शकता.

  • CSC सेंटर

  • विभागीय कृषि सह संचालक

  • नजीकच्या बँका

  • तालुका कृषि अधिकारी

खरीप पीक विमा 2023 साठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया

  • प्रधानमंत्री पीक विमा 202३ साठी जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी PMFBY च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

  • अधिकृत वेबसाइट वर अकाऊंट बनवावे लागेल.

  • खाते तयार करण्यासाठी, नोंदणी वर क्लिक करा आणि येथे विचारलेली सर्व माहिती बरोबर भरा.

  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर आपले खाते अधिकृत होईल.

  • तुमचे अकाऊंट तयार झाल्यानंतर अकाऊंटमध्ये लॉगिन करून पीक विमा योजनेचा फॉर्म काळजीपूर्वक भरा.

  • पीक विमा योजनेचा फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर यशस्वी संदेश दिसेल.

पिक विमा नुकसान भरपाई चे सूत्र

नुकसान भरपाई रक्कम रुपये= (उंबरठा उत्पादन – अपेक्षित उत्पादन)/ उंबरठा उत्पादन× विमा संरक्षण रक्कम× 25%

  • ज्या सर्व शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 23 जुलै 2023 च्या आधी पीक विमा पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

  • योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा अथवा आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधा.

  • शेतीशी संबंधित महत्वपूर्ण माहितीसाठी अ‍ॅप्लिकेशनल भेट देत रहा तसेच इतर शेतकरी मित्रांसोबत माहिती शेयर करायला विसरू नका.


31 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor