ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Oct
Follow
खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी
यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात सोमवारपर्यंत (ता. २३) परभणी जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६१५.३६ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८७.९४ हेक्टर मिळून एकूण ७ लाख ३४ हजार १०३.३३ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली आहे. यंदाच्या ई-पीकपाहणीत या दोन जिल्ह्यांतील ५ लाख ६७ हजारांवर शेतकरी खातेदार सहभागी झाले. शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीची मुदत सोमवारी (ता. २३) संपली असून तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor