किसान एक्स्पोमध्ये लाखो शेतकऱ्यांची मांदियाळी!
पुण्यातील मोशी येथे किसान शेतकरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरच्या लाखो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. यामध्ये शेतकऱ्यांना अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. यामुळे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, गोष्टी, प्रयोग, प्रकल्प प्रत्यक्ष पाहायला मिळाले. दरम्यान, किसानने 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या पाच दिवसांमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सेंटर येथे किसान शेतकरी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध कंपन्या, संस्था, सरकारी कृषी विभाग, उत्पादने, शेती क्षेत्रांत काम करणाऱ्या खासगी संस्था यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर यंत्रे कशी कामे करतात याचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना पाहायला मिळाले.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor