कलिंगड लागवडची माहिती

नमस्कार मंडळी,
महाराष्ट्रात कलिंगडाचे क्षेत्र सुमारे 660 हेक्टरने व्यापलेले आहे. कलिंगड हे उष्ण आणि कोरड्या उन्हाळ्याच्या महिन्यांत उगवणारे ताजेतवाने आणि गारव्याचे पीक आहे. कलिंगड लागवडीचा हंगाम हा डिसेंबर महिन्यात सुरू होतो. मार्च महिन्यात कलिंगड पिकाची काढणी केली जाते. तर काही भागात फेब्रुवारीच्या मध्यात कलिंगड पिकाची लागवड केली जाते पण डोंगराळ भागात मात्र मार्च-एप्रिलमध्ये कलिंगडाची लागवड करतात.
हवामान:
- कलिंगडच्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, कलिंगड पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
- कलिंगड पिकाला 24°C ते 27°C दरम्यानचे तापमान गरजेचे आहे.
- उगवण क्षमतेसाठी 22 ते 25 अंश सेल्सिअसचे तापमान गरजेचे असते.
जमीन:
कलिंगड पिकासाठी मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते या पिकाकरिता जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो.
वाण:
शुगरबेबी (माहिको), शुगरपॅक (सेमीन्स), महिसंपरुपती (महिको), ज्योती (अर्का), शुगर क्वीन (सिजेंटा), माणिक (अर्का)
बियाण्याचे प्रमाण:
कलिंगडासाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम चोळावे.
पूर्वमशागत:
- शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी.
- शेतात चांगले कुजलेले 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.
आता जाणून घेऊया कलिंगड लागवडीची पद्धत:
कलिंगडाची लागवड ही बिया टोकून करतात कारण त्याची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाही या पिकाची लागवड खालीलप्रमाणे केली जाते.
आळे पद्धत:
ठराविक अंतरावर आळे करून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी तीन ते चार बिया टोकाव्यात.
सरी-वरंबा पद्धत:
2x0.5 मीटर अंतरावर तीन ते चार बिया टोकून लावाव्यात.
रुंद गादीवाफ्यावर लागवड:
या पद्धतीत लागवड गादीवाफ्यावर दोन्ही बाजूंना करतात त्यामुळे वेल गादीवाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येत नाहीत व खराब होत नाहीत. यासाठी तीन ते चार मीटर अंतरावर सरी पाडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना एक ते 1.5 मीटर अंतरावर तीन ते चार बिया टोकाव्यात.
खत व पाणी व्यवस्थापन:
- कलिंगड पिकामध्ये खत व्यवस्थापनासाठी लागवडीपूर्व 50 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस व 50 किलो पोटॅश द्यावे व लागवडीनंतर 1 महिन्याने 50 किलो नायट्रोजनचा दुसरा हफ्ता द्यावा.
- जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे.
- वेलीच्या वाढीच्या काळात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- उन्हाळी हंगामात कलिंगडाला पाण्याच्या साधारणपणे 15 ते 17 पाळ्या द्याव्या लागतात.
आंतरमशागत:
- कलिंगडाची आंतरमशागत करताना बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुशीत ठेवावे.
- रानातील मोठे तण हातांनी उपटून टाकावे.
- भारी जमिनीत बी पेरल्या नंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोकावे.
काढणी:
- कलिंगड काढणी फळ पूर्ण पिकल्यावर करावी.
- नदीच्या पात्रातील फळे बागायती पेक्षा थोडी लवकर तयार होतात.
- बी पेरल्यापासून तीन ते साडेतीन महिन्यात काढणी सुरू होते व तीन ते चार आठवड्यात पूर्ण होते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून कलिंगडाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
- कलिंगड पिकाच्या फळधारणा अवस्थेत करायच्या खत नियोजनाविषयीच्या माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/TxTVUNJJmzb हे वाचा.
- वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
- त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
