कोंबड्यांच्या जाती
कुक्कटपालनात महाराष्ट्राचा नंबर बराच वरचा आहे. कुक्कटपालनासाठी एकूण खर्चात खाद्याचा वाटा 65 ते 70 टक्के असतो. म्हणून खाद्याच्या किमंतीवरच कुक्कटपालनाचा नफा व तोटा अवलंबून आहे. कोंबड्यांच्या काही संकरीत जाती पुढीलप्रमाणे:
देशी जाती :
भारतातील सर्व कोंबड्यांच्या जाती देशी या नावाने ओळखल्या जातात.
असील
हे पक्षी लढाऊ असल्याने कोंबड्यांच्या झुंजी लावण्यासाठी वापरतात, सध्या असील जात दुर्मिळ होऊ लागली आहे.
अंकलेश्वर
अंगाने भेध्यम असणारी ही कोंबडी अनिष्ट वातावरणास चांगली टक्कर देते, जडण-घडण चांगली अंडी देणाऱ्या कोंबडीसारखीच आहे.
चितगाव
ही कोंबडी भारताच्या पूर्व भागात आढळते. उंच व वजनदार असतो.
विदेशी जाती :
परदेशातून आणलेल्या जातींना विदेशी म्हणतात.
हलकी जात : या वजनाला हलक्या असतात. खाणे कमी व अंडी जास्त अशी यांची स्थिती आहे.
व्हाईट लेगहार्न : इटली या देशातील लेगहार्न खेड्यातून सर्वत्र पसरली. खाणे कमी व भारी वजनाची पांढरीशुभ्र अंडी या गुणामुळे व्यावसायिकांची आवडती बनली. ही कोंबडी दिसायाला पांढरीशुभ्र व आकाराने डौलदार असते.
ब्राऊन लेगहार्न : या कोंबडीची ठेवण, वजन आणि गुण जवळजवळ व्हाईट लेगहानरप्रमाणेच असतात पण दिसायला ही कोंबडी फारच आकर्षक असते.
तुम्ही कोंबड्यांच्या कोणत्या जातींचे पालन करता? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशाप्रकारच्या अजून माहितीसाठी "पशुसंवर्धन" चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor