ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 May
Follow
कोकणात मागणीमुळे सुक्या मासळीचे दर वधारले
कोकणात सुक्या व ओल्या मासळीला शहरी व ग्रामीण भागात प्रचंड मागणी असते. सध्या मासेच कमी मिळत असल्याने सुक्या मासळीचे दर वधारले आहेत. यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या सुके सोड्यांचे दर किलोला दर्जानुसार अडीच हजारांपासून साडेतीन हजारांवर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील बुरोंडी, हर्णे येथून येणाऱ्या सुक्या मासळीबरोबरच अलिबाग, गुजरातमधील कोलीमही रत्नागिरीतील बाजारात विक्रीसाठी येत आहे. कोळंबी, बोंबिल, चेवना आणि खारा माशांना चाकरमान्यांकडून मागणी वाढली आहे.
44 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor