कशी राखाल आंब्याची बाग तणविरहित
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आंब्याची व्यावसायिक लागवड केली जाते. 12750 मेट्रिक टन वार्षिक उत्पादनासह 2309 हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. भारतात दर्जेदार आंब्याचे उत्पादन केले जाते यापैकी अल्फोन्सो पाश्चिमात्य देशांना खूप आवडतो. आज आपण फळांचा राजा अशी प्रसिद्धी असणाऱ्या याच आंब्याच्या बागेला तणविरहित
कसे ठेवायचे याविषयी जाणून घेणार आहोत.
आंब्याची लागवड मुख्यतः जून, जुलै, ऑगस्टमध्ये केली जाते. कारण यावेळी पाणी, ऊन या बागेला आवश्यक त्या सर्वच गोष्टी योग्य प्रमाणात मिळतात. पण याच वेळेस बागेत तणांचे प्रमाणही जास्त दिसून येते. आंबा बागेवर तणांचा प्रादुर्भाव हा कायमस्वरूपी पाहायला मिळतो. हे तण आपण हाताने खुरपणीच्या साहाय्याने काढत राहिल्यास यामध्ये खूप वेळ व पैसे खर्च होणार म्हणूनच ग्रास कटर हे यावरील उत्तम समाधान आहे.
ग्रास कटरचा फायदा:
- वेळ व पैसा वाचतो.
- कापलेले तण मल्चिंग स्वरूपात वापरता येतात. यामुळे येणाऱ्या तणांची संख्या देखील कमी होते.
रासायनिक नियंत्रण:
- अधिक विस्तार असलेल्या झाडांमधील तण नियंत्रण करण्यासाठी ग्लायफोसेट 41% एसएल (देहात-MAC7) किंवा ग्लायफोसेट 71% एसजी (सुमितोमो-एक्सेल मेरा 71) याची फवारणी आंबा पानांशी संपर्क न येता करावी
- लहान विस्तार असलेल्या झाडांमधील तण नियंत्रण हे हाताने खुरपाच्या साहाय्याने करावे.
तुमच्या आंबा पिकाची बाग तणविरहित ठेवण्यासाठी तुम्ही काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor