तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
30 Mar
Follow

कुसुम सोलर पंप योजना 2024, महाराष्ट्र (Kusum Solar Pump Scheme 2024, Maharashtra)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

महाराष्ट्रात कुसुम योजना सुरु करण्यामागचे उद्दिष्ट शेतकऱ्यांचा खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच, राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देणे हे असून, कुसुम योजना वित्तमंत्री अरुण जेटली जी यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपाचे सौर ऊर्जा पंपांमध्ये रूपांतर करणार आहे. यामुळे देशातील शेतकरी जे डिझेल किंवा पेट्रोलच्या सह्याने सिंचन पंप चालवतात, ते पंप आता महाराष्ट्र कुसुम योजना 2024 अंतर्गत सौर उर्जेवर चालवले जातील. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल आणि पेट्रोल वर चालणारे देशातील 1.75 लाख पंप सौर पॅनलच्या मदतीने सौरऊर्जेवर चालवले जातील.

पंतप्रधान कुसुम योजना तीन भागांमध्ये विभागली आहे ते कोणते?

पहिला घटक ‘अ’ :

यामध्ये ज्यांची जमीन नापीक आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या शेतात सोलर प्लांट बसवून ते याचा फायदा घेऊ शकतील. यामध्ये 5000 किलोवॅटपासून ते 2 मेगावॅटपर्यंतचे सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत.

दुसरा घटक 'ब' :

पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत, घटक 'ब' मध्ये सौर पंप बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या फक्त 10% रुपये खर्च करावे लागतील. कारण खर्चानुसार 60% अनुदान सरकार देईल आणि 30% पर्यंत कर्ज दिले जाईल. हा सोलर पंप 25 वर्षांपर्यंत बसवला जाईल.

तिसरा घटक 'क' :

पीएम कुसुम (pm kusum solar yojana) योजनेच्या घटक 'क' मध्ये, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पंप आहेत ते त्यांचे सौरीकरण करू शकतात. अनेक गावांमध्ये २४ तास वीज उपलब्ध नसते. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सोलर प्लांट बसवून 24 तास वीज वापरू शकतो. शेतात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि जे डिझेल वापरतात त्यांचा डिझेलचा खर्चही वाचेल.

पीएम कुसुम योजना 2024 चे मुख्य उद्दिष्ट:

 • पंतप्रधान कुसुम योजनेचा (pm kusum solar yojana) मुख्य उद्देश भारतातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प बसवून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यातून वीज निर्मिती करणे हा आहे. यामुळे डिझेलवर चालणाऱ्या सर्व पंपांचा वापर थांबेल आणि पर्यावरण प्रदूषणही कमी होईल.
 • पीएम कुसुम योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज दिले जाते.
 • या अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या केवळ 10% खर्च करावा लागणार आहे.
 • या योजनेच्या मदतीने केंद्र सरकारला सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करायची आहे. जेणेकरून विजेच्या टंचाईवर मात करता येईल.
 • प्रत्येक गावात वीज पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पीएम कुसुम योजना 2024 चे फायदे:

 • पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत (pm kusum scheme) भारतातील शेतकऱ्यांना सोलर प्लांट दिले जाणार आहेत.
 • या योजनेमुळे भारतातील सर्व शेतकरी सोलर पंपाच्या साहाय्याने आपल्या शेतात सहज सिंचन करू शकतात.
 • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • त्यामुळे शेतकरी सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करून उत्पन्नही वाढवू शकतात.
 • सौरऊर्जेच्या वापरामुळे डिझेलचा खर्च आणि प्रदूषण कमी होईल.

पीएम कुसुम योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता:

 • पीएम कुसुम योजनेसाठी अर्जदार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • या योजनेसाठी अर्जदाराकडे किसान कार्ड असणे आवश्यक आहे.
 • पत्त्याचा पुरावा
 • अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचे फोटो

पीएम कुसुम योजना 2024 साठी अर्ज प्रक्रिया -

 • सर्व प्रथम अर्जदाराला पीएम कुसुम योजनेच्या (pm kusum solar yojana) अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर त्याचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
 • या होम पेजवर तुम्हाला पीएम कुसुम योजनेच्या (solar kusum yojana) पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक नवीन पेज उघडेल, यामध्ये तुम्हाला Make New Application या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर दुसरे नवीन पेज उघडेल.
 • मोबाईल नंबर टाकून OTP सत्यापित करा. यानंतर शेतकऱ्याची सर्वसाधारण माहिती टाकावी लागेल. यानंतर तुम्हाला Next बटणावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर, माहिती पुन्हा भरावी लागेल, येथे तुम्हाला शेतकऱ्याचे आधार ई-केवायसी, बँक खात्याशी संबंधित माहिती, जात स्वघोषणा, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि सौर पंपाची माहिती द्यावी लागेल.
 • यानंतर अर्जदाराला सेल्फ डिक्लेरेशनसाठी दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल. यानंतर तुम्ही ऑनलाइन पेमेंट कराल. एकदा पैसे भरल्यानंतर, तुम्हाला अर्ज क्रमांक प्राप्त होईल आणि एसएमएसद्वारे देखील माहिती मिळेल. यानंतर, तुमची सर्व माहिती प्रिंट करा आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

कुसुम योजनेंतर्गत महाराष्ट्राला अनुदान किती ?

 • कुसुम योजना महाराष्ट्रचा एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
 • सरकार शेतकर्‍यांना 60% अनुदान देईल
 • 30% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
 • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ 10% रक्कम द्याव्या लागतील.
 • या योजनेअंतर्गत सौर पॅनेल मधून तयार होणारी वीज शेतकरी विकू शकतो.
 • वीज विक्री करून मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय/धंदा सुरु करू शकतो.

कुसुम योजनेचे लाभ:

 • भारतातील सर्व शेतकरी कुसुम योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • अनुदानित किमतीत सौर सिंचन पंप उपलब्ध करून दिले जातात.
 • 10 लाख ग्रिड जोडलेल्या कृषी पंपांचे सौरीकरण या योजनेअंतर्गत केले जात आहे.
 • या योजनेतून मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती होणार आहे.
 • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 60% आर्थिक मदत दिली जाईल आणि बँक 30% कर्ज सहाय्य देईल आणि फक्त शेतकऱ्याला 10% रक्कम भरावी लागेल.
 • ज्या शेतकऱ्यांमध्ये राज्यात दुष्काळ आहे आणि जिथे विजेची समस्या आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना फायदेशीर ठरणार आहे.
 • सोलर प्लांट बसवल्यास 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सहज सिंचन करू शकतात.
 • सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी अतिरिक्त वीज, शेतकरी सरकारी किंवा निमसरकारी वीज विभागांना विकू शकतो, तेथून शेतकऱ्याला 1 महिन्यासाठी 6000 रुपयांची मदत मिळू शकते.
 • कुसुम योजनेंतर्गत जे काही सोलर पॅनल बसवले जातील, ते ओसाड जमिनीत बसवले जातील, त्यामुळे नापीक जमिनीचाही उपयोग होईल, तसेच नापीक जमिनीतून उत्पन्नही मिळेल.

अधिक माहितीसाठी आपण कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता जो खालीलप्रमाणे आहे.

संपर्क क्रमांक- 011-243600707, 011-24360404

टोल-फ्री क्रमांक- 18001803333

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पीएम कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र कोणासाठी लागू आहे?

ज्या शेतकऱ्यांनी आत्ता पर्यंत कोणत्याही सोलार योजनेचा लाभ घेतला नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम सोलर पंप योजना लागू आहे.

2. सोलर पंप बसवण्यासाठी किती खर्च येतो?

एका अश्वशक्तीच्या सौर पंपाची किंमत 90,000 रुपये आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी 40 टक्के वाटा म्हणून 36,000 रुपये द्यावे लागतील.

3. पंतप्रधान कुसुम योजनेचा उद्देश काय?

पंतप्रधान कुसुम योजनेचा (pm kusum solar yojana) मुख्य उद्देश भारतातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प बसवून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यातून वीज निर्मिती करणे हा आहे.

30 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor