तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
22 Mar
Follow

कुसुम सोलर पंप योजना 2025, महाराष्ट्र (Kusum Solar Pump Scheme 2025, Maharashtra)

नमस्कार शेतकरी बंधुनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारत सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेळोवेळी महत्त्वाची पावले उचलली जातात. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन, पीएम कुसुम योजना शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसविण्यासाठी भारत सरकारकडून 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. पंतप्रधान कुसुम योजना भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया या योजनेविषयीची अधिक माहिती.

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेचे उद्दिष्ट (Objectives of Maharashtra Kusum Yojana):

  • महाराष्ट्र शासनामार्फत ही योजना राबविण्या मागचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी पुरेशी वीज मिळावी, आणि शेतीवरील खर्च कमी व्हावा हा आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे. याशिवाय सौर पंपाद्वारे उत्पादित होणारी अतिरिक्त वीज ग्रीडला विकूनही शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनाचे मुख्य घटक:

  • पीएम कुसुम सोलर पंप योजनेचे पूर्ण नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान आहे.
  • ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती.
  • सध्या महाराष्ट्र कुसुम योजनेंतर्गत 3 घटक आहेत.
  • ज्या अंतर्गत सौर पंप, भाडेपट्टीचे उत्पन्न आणि डिस्कॉम लाभ समाविष्ट आहेत. घटकांबद्दल जाणून घेऊया:
  • घटक अ: शेतकरी आपली जमीन सौर उर्जा उत्पादकाला भाड्याने देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
  • घटक ब: डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या पंपांना सौर पंपामध्ये रूपांतरित करण्यासाठी सरकारला 60% सबसिडी मिळेल.
  • घटक क: या सौर पॅनेलचा वापर करून शेतकरी वीज निर्मिती करू शकतात आणि डिस्कॉम्सला विकून उत्पन्न मिळवू शकतात.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता (Documents/Eligibility Required for Kusum Solar Pump Scheme Maharashtra):

  • अर्जदार हा शेतकरी असावा आणि तो महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • जमिनीची कागदपत्रे
  • जमिनीचा सातबारा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर इ.

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज (Maharashtra Solar Pump Scheme Online Application):

  • महाराष्ट्र राज्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेत ऑनलाइन अर्ज करायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे:
  • सर्वप्रथम, तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट kusum.mahaurja.com वर जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, होम पेजवर तुम्हाला “Apply” विभागात New Consumer (3/5 HP) आणि New Consumer (7.5 HP) पर्याय सापडतील.
  • तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार सोलर पंप निवडावा लागेल.
  • सोलर पंप निवडल्यानंतर अर्ज फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या प्रविष्ट करा.
  • त्यानंतर फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • आता शेवटी अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुमची महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजना यशस्वीपणे लागू होईल.

अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया:

  • अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट उघडा.
  • होम पेजवर तुम्हाला Application Status मेन्यूमध्ये Application Current Status चा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील पेज उघडेल.
  • या पेजवर, तुम्हाला Beneficiary ID प्रविष्ट करावा लागेल आणि Search बटणावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर अॅप्लिकेशनचा स्टेटस तुमच्या समोर येईल.

अधिक माहितीसाठी तुम्ही कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता जे खालीलप्रमाणे आहेत.

संपर्क क्रमांक- 011-243600707, 011-24360404

टोल-फ्री क्रमांक- 18001803333

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी किती अनुदान दिले जाते?

कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसविण्यासाठी भारत सरकारकडून 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

2. महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

महाराष्ट्र शासनामार्फत ही योजना राबविण्या मागचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी पुरेशी वीज मिळावी, आणि शेतीवरील खर्च कमी व्हावा हा आहे.

3. महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेसाठी अधिकृत वेबसाइट कोणती??

महाराष्ट्र कुसुम योजनेसाठी अधिकृत वेबसाइट kusum.mahaurja.com ही आहे.

36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor