तपशील
ऐका
भेंडी
कृषी ज्ञान
देहात
5 year
Follow

भेंडी: फळ पोखरणारी अळी

ही अळी वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता आणि जास्त उष्ण तापमान या अळीस पोषक असते. या किडीच्या अळ्या मऊ देठ, फुलांच्या पाकळ्या आणि लहान फळांमध्ये शिरून आतून पोखरतात.  बाधित फळे अनेकदा वाकडी होतात, त्यामुळे फळांचा दर्जा खराब होतो. अशी फळे बाजारात विकणे फार कठीण होते.

फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, प्रथम किडलेल्या कळ्या, फुले आणि फळे गोळा करून जाळून टाकावीत. त्याचबरोबर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. भेंडीमधील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रति एकर शेतात 10 कामगंध सापळे लावावेत. किडीची अंडी दिसून येताच ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाचे 5-6 ट्रायकोकार्ड (40000 लाख अंडी प्रति एकर ) 8-10 दिवसांच्या अंतराने लावावेत. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी @ 0.4 मिली/ लिटर  किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% डब्ल्यूजी @ 0.5 ग्रॅम/ प्रति ली किंवा डेल्टामेथ्रीन 1% + ट्रायझोफॉस 35% ईसी ( (बायोस्टेट - फुल्स्टोप डी) 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीसाठी स्टिकर चा वापर करावा.


याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


  • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home

  • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre



2 Likes
1 Comment
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor