उन्हाळ्यात पिकवण्यासाठी सर्वोत्तम भाज्या (List of Best vegetables to grow in summer)
उन्हाळ्यात पिकवण्यासाठी सर्वोत्तम भाज्या (List of Best vegetables to grow in summer)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
भारतात उन्हाळ्यात (Summer Vegetables) विविध प्रकारच्या भाज्या (Vegetables to grow in Summer) पिकवल्या जातात. या भाज्यांना त्यांच्या वाढीसाठी उच्च तापमान आणि कोरडे हवामान आवश्यक असते. या उन्हाळी भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळ्यातील (Summer veggies to grow) या भाज्या पिकवणे जसे हंगामानुसार योग्य आहे तसेच यांचे उन्हाळ्यात सेवन करणे देखील आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जाते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचे नियोजन व घ्यावयाच्या काळजी विषयीची माहिती.
भेंडी आणि गवार (Okra and Cluster Bean):
- भेंडी आणि गवार या भाज्या भारतातील लोकप्रिय उन्हाळी भाज्यांपैकी (Summer Vegetables) आहेत.
- उन्हाळ्यामध्ये (Summer vegetables to grow) घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांना मागणीसुद्धा भरपूर असते.
भेंडी:
- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.
- 20 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.
- 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.
- समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त.
- भेंडीच्या चांगल्या उत्पादनासाठी, तुम्ही 'देहात' च्या काही उत्कृष्ट वाणांची निवड करू शकता. ज्यामध्ये 'देहत डीएचएस 1195', 'देहत डीएचएस 1197' आणि 'देहत डीएस हरिका सुपर' या वाणांचा समावेश आहे. याशिवाय, तुम्ही सिजेंटा-ओएच 102, नामधारी-एनएस 862 भेंडी, शाईन अदिती सुपर F1 हायब्रीड, इत्यादी वाण देखील निवडू शकता.
गवार:
- गवार हे उष्ण हवामानातील (Summer veggies to grow) पिक आहे.
- सरासरी 18 ते 30 अंश सेल्सिअस तपमानात गवार हे पिक उत्तम येते.
- खरीपातील उष्ण व दमट हवेमुळे गवार पिकाची वाढ चांगली होते.
- तसेच गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा मोसमी, शरद बहार, पुसा नवाबहार, फुले गवार, नीलम 61 ही वाण देखील निवडू शकता.
- उन्हाळ्यात भेंडी व गवार पिकांना पाणी वेळेवर द्यावे. या पिकांची तोडणी संध्याकाळच्या वेळेस (5 नंतर) करावी.
वेलवर्गीय भाजीपाला पिके (Vegetable Crops):
- वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे.
- या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते.
- लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही कामे महत्त्वाची आहेत.
- दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार द्यावा.
- कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून, वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते.
कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी पिकांच्या लागवडीसाठी योग्य वाण (Bittergourd, Bottlegourd, Spongegourd) :
- कारली: व्हेंचुरा (महिको), NS 453 (नामधारी), अभिषेक (सेमिन्स), अमनश्री (नुनहेम्स)
- दुधी भोपळा: सम्राट (Riccia बियाणे), समर प्रोलिफिक लॉंग (पुसा), समर प्रोलिफिक राउंड (पुसा), बहार (अर्का), नवीन (पुसा)
- दोडका: यू एस 6001 (नुनहेम्स), आरती (व्हीएनआर), लतिका (अंकुर), एमएचआरजी 7 (महिको)
- घोसाळी: घोसाळ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी, तुम्ही 'देहात' च्या डीएचएस २४०२ या वाणाची लागवड करू शकता त्याचसोबत आलोक (वीएनआर) हे वाण देखील वापरू शकता.
आधारासाठी मंडप किंवा ताटी पद्धत:
- वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून 4 ते 6 फूट उंचीवर वाढतात.
- फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते.
- हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, कीटकनाशकांची फवारणी ही कामे सुलभ होतात.
- दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये अडीच ते तीन पट वाढ होते. मंडप पद्धतीमुळे फवारणी सुलभ होते.
- कारली, दोडका व घोसाळी या पिकांना ताटी पद्धत वापरणे सोईस्कर असते.
- वेलवर्गीय पिकांना वेळच्या वेळी पाणी द्यावे.
- वेलांना वळण व आधार दिल्यानंतर पिकास मातीची भर द्यावी. गरजेप्रमाणे खत द्यावे.
मिरची, वांगी आणि टोमॅटो (Chilli, Brinjal and Tomato):
- या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावी.
- डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादीवाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते.
- या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी दक्ष राहावे.
मिरची:
- मिरचीची लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असे करावे.
- लागवडीसाठी वाण हे उंच शाकीय वाढणारे, फांद्या जास्त असणारे, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्यांचे असावे.
- मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात व झाडावर दाट पाने असतात.
- मिरचीसाठी वैशाली एफ1- (सागर हायब्रीड), ज्योती (निर्मल), सितारा (निर्मल), ज्वेलरी (नॉन्गवू), सोनल (रासी हायवेज) यांसारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी.
वांगी:
- वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारे काटेरी देठ, जांभळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चकाकीदार गोल किंवा उभट गोल फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी.
- वांग्यामध्ये रंग व आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येते.
- वांगी पिकास शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा.
- उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी द्यावे.
- फळांची तोडणी 5-6 दिवसांनी करावी.
- चांगली, एकसारखी फळे बाजारात पाठवावीत.
वांग्यासाठी प्रकारानुसार
- जांभळी पांढरी - काटेरी वाण : कल्पतरू - महिको, केईपीएच 218 - कुमार बायोसीड
- जांभळी, पांढरी हिरवट - काटेरी वाण : महिको110-महिको, अजय - अंकुर
- हिरवे जांभळे - काटेरी वाण : राकेश - अंकुर
- हिरवे पांढरे - काटेरी वाण : अंकुर - पन्ना
- जांभळे पांढरे - विना काटेरी वाण : महिको11
- जांभळी - विना काटेरी वाण : सीमा 2 - अॅडवंटा, भटाई - अंकुर
- गडद जांभळी - विना काटेरी वाण : 202 - केईपीएच , सायली - अंकुर
- हिरवे - विना काटेरी वाण : कीर्ती - अंकुर, हर्षल - अंकुर
- हिरवे जांभळे - विना काटेरी वाण : विजय - अंकुर
यांसारख्या जातींची निवड करावी.
टोमॅटो:
- टोमॅटो पिकासाठी वाण निवडताना प्रामुख्याने वाण अधिक पाने असणारे, उष्ण तापमानात फळधारणा होणारे, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील व फळांना तडे न जाणारे निवडावे.
- टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.
- टोमॅटोसाठी अभिनव(सेमिनीस), अभिराज(सेमिनीस), अलंकार(Clause), रुपाली(इंडो अमेरिकन सीड), जयम 2 (Advanta सीड्स) यांसारख्या जातींची निवड करावी.
कांदापात (Onions):
- कांद्याच्या वाढीत आणि विकासात हवामान महत्त्वाची भूमिका बजावते.
- कांदा हे व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्वाचे भाजीपाला पीक आहे.
- महाशिवरात्रीस कांद्याची रोपे टाकून त्याची लागवड गुढीपाडव्यापर्यंत करावी.
- कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.
- उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत कांद्याच्या पातीची वाढ चांगली होते.
कोथिंबीर (Coriander):
- कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते.
- उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले होते.
- कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत.
- दर आठ दिवसाच्या अंतराने कोथिंबिरीची लागवड करावी.
- कोथिंबीरसाठी जळगाव धना, वाई धना, कार्बी- बेजो सीड्स, लाम सी.एस.-2, लाम सी.एस.-4 यांसारख्या जातींची निवड करावी.
राजगिरा, पोकळा, माठ, मेथी:
- उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या महत्त्वाच्या आहेत.
- पालेभाज्या आपल्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहजसुलभ नैसर्गिक स्रोत आहेत.
- शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल, कमी क्षेत्रात, कमी वेळेत उत्पादन देतात.
- पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणे व वाहतुकीची चांगली सोय असणे या बाबी महत्त्वाच्या आहेत.
- उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ, मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात.
उन्हाळी (Summer Vegetables) हंगामात भाजीपाला पिकाची लागवड करताना घ्यावयाची काळजी (Care to be taken while planting vegetable crop in summer season):
- लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब असलेल्या व पाणी साठवून ठेवणाऱ्या, परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी.
- जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा.
- कोरड्या व उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी.
- रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे लक्ष द्यावे.
- फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी व पॅकिंग, साठवण व योग्य वेळी मालवाहतूक (पहाटेच्या वेळी) या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करावा. त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल.
तुम्ही उन्हाळ्यात (Vegetables to grow in Summer) कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात उन्हाळ्यात पिकवण्यासाठी उत्तम भाज्या कोणत्या?
भारतात उन्हाळ्यात पिकवण्यासाठी उत्तम भाज्यांमध्ये टोमॅटो, काकडी, भेंडी, वांगी यांचा समावेश आहे.
2. उन्हाळ्यात पालेभाज्या पिकवू शकतो का?
उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या महत्त्वाच्या आहेत. राजगिरा, पोकळा, माठ, मेथी अशा भाज्यांची पिके आपण उन्हाळ्यात घेऊ शकतो.
3. उन्हाळ्यात कंटेनरमध्ये भाजीपाला पिकवू शकतो का?
होय, उन्हाळ्यात कंटेनरमध्ये भाजीपाला पिकवता येऊ शकतो. तथापि, आपल्याला त्यांना वारंवार पाणी देण्याची आणि उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी सावली प्रदान करण्याची आवश्यकता असू शकते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor