कपाशीतील बोंड सड रोगाचे प्रकार आणि व्यवस्थापन (Major Causes and Management of Boll Rot disease in Cotton)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कापसाची पांढरे सोने म्हणूनही सर्वत्र ओळख आहे. कापसाचे उत्पादन 100 पेक्षा अधिक देशांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. याच कपाशी पिकावर बोंडसड होण्याची समस्या बऱ्याच भागामध्ये दिसून येत आहे. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण जाणून घेणार आहोत कपाशीमध्ये बोंड सड होण्याची प्रमुख कारणे आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती.
कपाशीमधील बोंड सड म्हणजे काय?
- कपाशीमधील बोंड सड या रोगामध्ये बहुतेक बोंडे बाह्य भागावरून निरोगी दिसतात. तर काही बोंडांवर रस शोषणाऱ्या किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येतात.
- साधारणतः बोंडातील एक ते दोन कप्पे तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे आढळते.
- पावसाळ्यात होणारा संततधार व रिमझिम पाऊस, सततचे ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता इ. घटकांमुळे आंतरिक बोंड सड या रोगाची समस्या आढळते.
- बहुतेक वेळा बोंडाच्या पृष्ठभागावर बुरशींची वाढ झाल्याचे दिसते.
बोंड सडीचे मुख्य प्रकार (Types of Boll Rot):
अंतर्गत बोंड सड (Internal Boll Rot):
- कपाशीवरील बोंडसड ही समस्या प्रामुख्याने कमी प्राणवायू अवस्थेत होते.
- ही सड तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात आंतर वनस्पती, रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होते.
- बोंडे बाहेरून निरोगी दिसत असली तरी फोडली असता आतील रुई पिवळसर - गुलाबी ते लाल - तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते.
बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग (Boll Rot):
- बोंडाच्या पृष्ठभागावर होणाऱ्या संसर्गामध्ये काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोडांवरील जिवाणू करपा कारणीभूत असतो.
- बोंडे परिपक्व आणि उमलण्याच्या अवस्थेत बोंडाच्या पृष्ठभागावर संसर्ग आढळून येतो.
- बहुतेक वेळा बोडांवर बुरशीची वाढ झाल्याचे दिसते.
कपाशीमधील बोंड सड रोगावरील उपाययोजना:
- बोंडांना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. यामुळे त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच इतर नुकसानदायक बुरशीची वाढ होणार नाही.
- कपाशी पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.
- पात्याफुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील आद्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडरोगाच्या व्यवस्थापनासाठी, बोंडांच्या पृष्ठ भागावर होणारा बुरशींचा संसर्ग रोखण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळावा.
- अतिप्रमाणात सिंचन करू नये. त्यामुळे पिकाची कायिक वाढ होते व किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
खालीलपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी (मात्रा प्रति दहा लिटर व नॅपसॅक पंपासाठी):
- प्रोपीनेब 70% डब्लूपी (देहात - झिनॅक्टो) 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- प्रोपीकोनॅझोल 25% ईसी (क्रिस्टल - टिल्ट) 10 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) 200 मिली प्रति एकर फवारणी करावी किंवा
- टेबुकोनाझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 25% डब्ल्यू/डब्ल्यू डब्ल्यूजी (बायर-नेटिव्हो) 500 ग्रॅम ची 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
तुम्ही तुमच्या कपाशी पिकातील बोंड सड रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कापसाची लागवड कधी करावी?
कापसाची लागवड मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
2. कापसाची वेचणी कधी करायची?
कापूस पूर्णपणे परीपक्व झाल्यावर म्हणजेच वाणांच्या परीपक्वतेच्या कालावधीनुसार साधारणतः 145 ते 160 दिवसांत कापसाची वेचणी करवी.
3. कापूस लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
पाण्याचा निचरा होणारी व जलसंधारणशक्ती उत्तम असणारी मध्यम ते भारी जमीन कापूस लागवडीसाठी उत्तम समजली जाते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor