तपशील
ऐका
लिंबू
कृषी ज्ञान
DeHaat Channel
27 Aug
Follow

लिंबू पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Major diseases of citrus and their management)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

लिंबू हे कमी खर्चात जास्त नफा देणारे पीक आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे वर्षभर बाजारात लिंबाची मागणी कायम राहते. भारत हा जगातील सर्वात मोठा लिंबू उत्पादक देश आहे. भारत तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांमध्ये लिंबाची लागवड केली जाते. एकदा लिंबाची लागवड केल्यावर त्यापासून 10 वर्षे उत्पादन घेता येते. लिंबाचे रोप सुमारे ३ वर्षांनी चांगले वाढते आणि लिंबाची झाडे वर्षभर उत्पन्न देत राहतात. एका एकरात लिंबू लागवड करून वर्षाला सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकतं. देशातील अनेक शेतकरी लिंबाची लागवड करून भरपूर नफा कमावत आहेत. मात्र लिंबू पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण लिंबू पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

लिंबू पिकातील प्रमुख रोग:

  • कँकर/खैऱ्या रोग
  • पायकूज व डिंक्या रोग
  • शेंडे मर रोग
  • सिट्रस ग्रिनिंग

कँकर/खैऱ्या रोग (Citrus Canker):

  • हा रोग कोवळया, हिरव्या फळांवर व फांद्यावर आढळतो, रोगाची बुरशी फळाच्या सालीवर वाढलेली आढळते.
  • सुरुवातीचे लालसर तपकिरी रंगाचे ठिपके हे पुढे वाढत जाऊन फळांची साल फाटते व फळे तडकतात.
  • रोगट फळे चवीला पनघट लागतात. तसेच फांदीच्या सालीवर वेड्यावाकड्या आकाराचे खोलगट चट्टे दिसतात.
  • फळावर डाग पडत असल्यामुळे अशा फळांना बाजारात मागणी राहत नाही. अशी फळे प्रतवारीमध्ये वेगळी करूनच बाजारात न्यावी लागतात.
  • कँकर रोगामुळे 50-60 टक्के उत्पन्न कमी होण्याची नोंद आहे.

व्यवस्थापन (Canker Management):

  • बागेतील रोगट फळे नष्ट करावी.
  • पावसाळ्यात झाडावर नवीन फुट येण्यापूर्वी आणि अर्धवट पोसलेल्या कोवळ्या पानांवर, फांद्यावर 300  लिटर पाण्यात 750 ग्रॅम मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी (देहात:DEM-45) व बुरशीनाशकाच्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. किंवा
  • कासुगामायसीन 5% + कॉपर ऑक्सिक्लोराईड 45% डबल्यु पी (धानुका-कोनिका) ची 300 ग्रॅम एकरी फवारणी करावी.
  • बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईडचे संरक्षक फवारणी केल्यास रोगाच्या प्रसारावर पुरेसे नियंत्रण मिळते.

पायकूज (Citrus Foot Rot):

  • या रोगात झाडाच्या कलम युतीचा भाग जमिनीत गाडल्या गेल्यास तेथे या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • नंतर हा प्रादुर्भाव मुळावर पसरतो.
  • झाडाची मुळे कुजतात व बुंधाची साल कुजते.
  • पाने निस्तेज होऊन शिरा पिवळ्या पडतात व फळेही गळतात.
  • मोठ्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण हळूहळू दिसू लागते अशावेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.

व्यवस्थापन (Foot Rot Management):

  • या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त झाडाचा संपूर्ण वाफा खोदून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात.
  • वर निर्देशित उपायोजना झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी (ब्लू कॉपर-क्रिस्टल) हे मिश्रण असणारे बुरशीनाशक 25 ग्रॅम + 50 मिली जवस तेल + दहा लिटर पाणी घेऊन झाडाच्या परिघामध्ये मिसळावे किंवा आळवणी करावी व मातीने वाफा झाकून घ्यावा किंवा
  • मेटालॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यू पी (टाटा-मास्टर) हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाशेजारील मातीत एक महिन्याच्या अंतराने दोनदा ओलेचिंब किंवा ड्रेंचिग करावी.

शेंडे मर रोग (Citrus Dieback):

  • या रोगात कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वळतात व त्यामुळे फांद्यावरील पाने पिवळी पडतात व गळतात.
  • फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो व त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसतात.
  • या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

व्यवस्थापन (Dieback Management):

  • या रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडावरील रोगट वाळलेल्या फांद्या म्हणजे साल पावसाळ्यापूर्वी काढून जाळून टाकाव्यात.
  • छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी.
  • कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यू पी (क्रिस्टल-बाविस्टन) 400 ग्रॅम किंवा
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी (देहात:DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर किंवा
  • कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्लूपी (क्रिस्टल-ब्लू कॉपर) 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून वर्षातून 3-4 फवारण्या कराव्यात.
  • खताचा वापर करताना कॉपर सल्फेटचा डोस वापरा.

सिट्रस ग्रिनिंग (Citrus Greening):

  • सिट्रस ग्रिनिंग हा लिंबूवर्गीय फळझाडांमधील एक महत्त्वाचा रोग असून, अनेक राज्यांमध्ये उत्पादनावर मोठा परिणाम करतो.
  • हा रोग जवळ जवळ सर्व जातींची लिंबूवर्गीय फळझाडे संक्रमित करतो.
  • रोगाची लक्षणे बहुधा परिवर्तनशील असतात आणि बहुतांश भागांसाठी विशिष्ट नसतात. बऱ्याच वेळेस सिट्रस ग्रिनिंग रोगग्रस्त झाड आणि जस्त किंवा लोह यासारख्या खनिजांच्या कमतरतेची लक्षणे सारखीच दिसतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो.
  • पिवळ्या कोंबाचा उदय हे सिट्रस ग्रिनिंग होण्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. म्हणून या रोगाचे दुसरे नाव 'हाँगलॉन्गबिंग' (एचएलबी) असे सुद्धा आहे.
  • पानांवर डाग पडणे.
  • रोगाची तीव्रता अधिक झाल्यास पानाचा काही भाग हिरवा राहून बाकी भाग पिवळा पडतो.
  • फांद्या मृत झाल्यामुळे झाडे विरळ दिसतात.
  • रोगग्रस्त फळे आकाराने लहान, कुरूप, चवीला कडू व निम्न दर्जाची असतात. अशी फळे, बीजविरहित असतात.

व्यवस्थापन (Greening Management):

  • टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड* 600 पीपीएम (1200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी) या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणाची हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात) 45 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. झिंक सल्फेट व फेरस सल्फेट (200 ग्रॅम प्रत्येकी) झाडाच्या आळ्यामध्ये दोन वेळा विभागून वापरावे.
  • रोगाचा प्रसार करणाऱ्या एशियन सिट्रस सायला या किडीच्या सक्रिय काळात थायामेथोक्झाम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) 100 ग्रॅमची किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 100 मिली प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पुढील फवारणी 15 दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.

तुम्ही तुमच्या लिंबू पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. लिंबू पिकाला लागणारे प्रमुख रोग कोणते?

कँकर/खैऱ्या रोग, पायकूज व डिंक्या रोग, शेंडे मर रोग हे लिंबू पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.

2. लिंबू पिकासाठी योग्य हवामान कोणते?

लिंबू वनस्पतीसाठी अर्ध-शुष्क हवामान सर्वोत्तम आहे.

3. लिंबू पिकासाठी कोणती जमीन योग्य असते?

लिंबू रोपासाठी वालुकामय, चिकणमाती सर्वोत्तम मानली जाते. याशिवाय लाल लॅटराइट जमिनीतही लिंबू पिकवता येतो.

37 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor