तपशील
ऐका
कृषी
भोपळा
कीटक
कृषी ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
24 July
Follow

भोपळा पिकातील कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Major Pests and their management in Pumpkin)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भोपळा हे वेलवर्गीय फळभाजी पैकी एक महत्त्वाचे पीक आहे. भोपळ्याच्या प्रत्‍येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फूले असतात. त्‍यापैकी फक्‍त फुलांनाच फळधारणा होते. महाराष्‍ट्रामध्‍ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्‍टर क्षेत्र आहे. विशेषत: पितृपंधरवडा व नवरात्रीतील उपवासासाठी भोपळ्याला भरपूर मागणी असते. हा कालावधी साधून भोपळ्याची लागवड केल्यास त्यापासून चांगला आर्थिक लाभ मिळतो. योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास भोपळ्याच्या पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. भोपळा हे पिक कीड व रोगास फारच संवेदनशील आहे. किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण भोपळ्याच्या पिकातील प्रमुख किडींविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

लाल भुंगेरा (Red Beetle):

लाल भुंगेरा किटकाची ओळख (Identification of Pumpkin Red Beetle) :

  • भुंगेरे लाल रंगाचे तर अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते.
  • प्रौढ भुंगा निमुळता, नळीसारखा लांबट व लाल असतो.
  • शरीरावर हिरव्या रंगाची चमकणारी छटा असते.

लाल भुंगेरा किटकाची लक्षणे (Symptoms of Red Beetle):

  • मादी भुंगेरे पानाच्या मागील बाजूस अंडी घालते. अंड्यामधून 6 ते 7 दिवसांत छोट्या मातकट पांढरट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.
  • अळ्या पानामधील हरितद्रव्य खरवडून उपजीविका करतात. त्याच ठिकाणी 12 ते 15 दिवसांत कोषावस्थेत जातात.
  • कोष किंचित पांढरट तांबूस असतात. त्यामधून जवळपास एका आठवड्याने भुंगे बाहेर पडतात.
  • अळी आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत.
  • प्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात.
  • अळ्या पान स्वतःभोवती गुंडाळून खरवडून आतील हरित भाग खातात. त्यामुळे पानावरती समांतर पांढऱ्या रेषा उमटतात.
  • अनेक रेषा एकमेकात मिसळून त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. कालांतराने असे चट्टे तपकिरी होतात, पाने करपल्यासारखी दिसतात.
  • किडीचा प्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापूर्वी होत असतो.
  • किडीचा प्रादुर्भाव पाणथळ जमिनीमध्ये आणि नत्र खताच्या मात्रा अधिक दिल्याने वाढतो.

लाल भुंगेरा किटकाचे व्यवस्थापन (Management of Red Beetle):

  • क्विनालफोस 25% ईसी (धानुका-धानुलक्स) 400 मिली/प्रति एकरी 200 लिटर पाणी किंवा
  • ट्रायझोफॉस 40% ईसी (प्रोटेक्ट) 250 मिली /प्रति एकरी 200 लिटर पाणी किंवा
  • लॅम्डासायहॅलोथ्रीन 5% ईसी (सिंजेन्टा-कराटे) प्रवाही) 120 मिली/प्रति एकरी 200 लिटर पाणी फवारणी करावी.

फळमाशी (Fruit Fly):

फळमाशीची ओळख (Identification of Pumpkin Fruit Fly):

  • फळमाशी रंगाने पिवळसर तांबूस असते.
  • फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा मी. मी. लांब असते.
  • फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.

फळमाशीची लक्षणे (Symptoms of Fruit Fly):

  • फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.
  • त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात.
  • या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात.
  • या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.

फळमाशीचे व्यवस्थापन (Management of Fruit Fly):

  • शेतात कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
  • फ्लुबेंडियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (बायर-फेनोस क्विक)100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • सायंट्रानिलिप्रोल 10.26% डब्ल्यू /डब्ल्यू ओडी (एफएमसी-बेनेविया) 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फ्लुबेंडिएमाइड 39.35% एम/एम एस.सी (बायर-फेम) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

पांढरी माशी:

पांढऱ्या माशीची ओळख (Identification of Pumpkin White fly) :

  • पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
  • रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
  • या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
  • कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
  • पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.

पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms of White fly):

  • पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
  • या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in Pumpkin) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
  • झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
  • या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन (Management of White fly):

  • प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
  • याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा  किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

कोळी (Mites):

कोळी कीटकाची ओळख (Identification of Pumpkin Mites):

  • कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्यांनी दिसणे कठीण जाते.
  • पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते.
  • प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात.
  • पिले व प्रौढ कोळी दिसायला सारखेच असले, तरी आकार लहान - मोठा असतो.

कोळी कीटकाची लक्षणे (Symptoms of Mites):

  • हे कीटक पानाच्या मागच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषतात.
  • प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात.
  • झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कोकडलेली दिसतात.
  • सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळतात.
  • प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते.
  • उत्पादनात भारी घट होते.

कोळी कीटकाचे व्यवस्थापन (Management of Mites):

  • नियंत्रणासाठी डायफेंथियूरोन 50% डब्ल्यूपी (सिजेंटा - पेगासस) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा
  • प्रोपरगाईट 57% ईसी (ओमाईट- धानुका) 400 मिली प्रति एकर किंवा
  • फेनाझाक्विन 10% ईसी (कोर्टेवा-मॅजिस्टर) 200 मिलीची एकरी किंवा
  • स्पाइरोमेसिफेन 240 एससी 22.9% डब्ल्यू/डब्ल्यू (बायर - ओबेरॉन) 200 मिलीची प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या भोपळा पिकातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भोपळा पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

भोपळा पिकाच्या वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. या पिकाच्या वाढीसाठी 18 अंश से. ते 29 अंश से. तापमान, भरपूर व स्वच्छ सूर्यप्रकाश पोषक असतो.

2. भोपळा लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

भोपळा हलक्या ते मध्यम चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम पोसतो. तसेच नदीकाठच्या व नदीतील रेताड जमिनीत देखील चांगल्या प्रकारे येतो.

3. भोपळा पिकासाठी योग्य हंगाम कोणता?

भोपळा पिकासाठी खरीप व उन्हाळी हंगाम योग्य मानला जातो. तसेच खरीप हंगामासाठी जून-जुलै तर उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड केली जाते.

45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor