झेंडू पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Major pests in Marigold and their management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडू हे संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये झेंडूची लागवड केली जाते. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणुन, तसेच भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक म्हणुन देखील झेंडूचे पीक घेता येते. तसेच कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर देखील झेंडूची शेती करता येते. मात्र योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास झेंडूच्या पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण झेंडूच्या पिकातील प्रमुख किडींविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
मावा कीटक (Aphid) :
मावा कीटकाची ओळख (Identification of Marigold Aphids):
- मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
- मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.
मावा कीटकाची लक्षणे (Symptoms of Aphids):
- हे कीटक झेंडूची पाने आणि कळ्यांभोवती समूहात आढळतात.
- हे कीटक कोवळ्या पानांमधील रस शोषून घेतात.
- त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
- ही कीड सोंडेद्वारे रोपातील अन्नरस शोषते.
- मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.
मावा कीटकाचे व्यवस्थापन (Management of Aphids):
- निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
- फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
- बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.
तुडतुडे (Jassid):
तुडतुडे कीटकाची ओळख (Identification of Marigold Jassid):
- किडीची 4 ते 5 मि. मी. लांबी, रंग हिरवट करडा असून, आकार पाचरीसारखा असतो.
- डोक्यावर तपकिरी रंगाचे तीन ठिपके असतात.
- तुडतुडे चालताना तिरपे चालतात ही त्याची प्रमुख ओळख आहे.
तुडतुडे कीटकाची लक्षणे (Symptoms of Jassid):
- तुडतुडे ही कीड पानातील रस शोषून घेते तसेच तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषून घेतात.
- तुडतुड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे, पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते.
- प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो.
- या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात, फळांची वाढ खुंटते, फळे गळून पडतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते.
- बहार धरल्यानंतर रोजच्या रोज बागेवर लक्ष ठेवून किड आढळताच नियंत्रणाचे उपाय करावेत.
- तुडतुड्यांमुळे उत्पादनात 50 ते 70% पर्यंत घट येऊ शकते.
तुडतुडे कीटकाचे व्यवस्थापन (Management of Jassid):
- या किडीच्या नियंत्रणासाठी ऐसफेट 50% + इमिडा 1.8% एसपी (यूपीएल-लान्सर गोल्ड) 300 ग्रॅम किंवा
- फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली 200 लिटर पाणी किंवा
- एसेटामिप्रिड 20% एसपी (टाटा-मानिक) 50 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी
पांढरी माशी:
पांढऱ्या माशीची ओळख (Identification of Marigold White fly) :
- पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
- रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
- या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
- कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
- पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.
पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms of White fly):
- पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
- या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in Rose) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
- झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडतात यामुळे उत्पादनात घट येते.
- या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन (Management of White fly):
- प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
- कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
- याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
कोळी (Mites):
कोळी कीटकाची ओळख (Identification of Marigold Mites):
- कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्यांनी दिसणे कठीण जाते.
- पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते.
- प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात.
- पिले व प्रौढ कोळी दिसायला सारखेच असले, तरी आकार लहान - मोठा असतो.
कोळी कीटकाची लक्षणे (Symptoms of Mites):
- हे कीटक पानाच्या मागच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषतात.
- प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात.
- झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कुडतडलेली दिसतात.
- सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळतात.
- प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते.
- उत्पादनात भारी घट होते.
कोळी कीटकाचे व्यवस्थापन (Management of Mites):
- नियंत्रणासाठी डायफेंथियूरोन 50% डब्ल्यूपी (सिजेंटा - पेगासस) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा
- क्लोरफेनापीर 10% एससी (Inteprid - BASF) 300 ते 400 मिली प्रति एकर किंवा
- सायनोपायराफेन 30% (Kunoichi- Insecticide india) 80 ते 120 मिली प्रति एकर किंवा
- पायरिडाबेन 20% डबल्यु/डबल्यु डबल्युपी (हनाबी - गोदरेज) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा
- फेनपायरॉक्सिमेट 5% एससी (सेडना - टाटा) 120 ते 240 मिली प्रति एकर किंवा
- स्पाइरोमेसिफेन 240 एससी 22.9% डब्ल्यू/डब्ल्यू (बायर - ओबेरॉन) 200 मिलीची प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
सुरवंट (Cutworms):
सुरवंटाची ओळख (Identification of Marigold Cutworms):
- सुरवंट सर्वसाधारणपणे दिसायला सारखे असतात.
- ते खूप कमी केसांसह गुळगुळीत असतात आणि पूर्ण वाढ झाल्यावर सुमारे दोन इंच लांब असतात.
- मोठे झाल्यावर ते सामान्यत: 'C' आकारात दिसतात.
- वेगवेगळ्या प्रजाती एकमेकांपेक्षा वेगळ्या दिसू शकतात आणि त्या तपकिरी, गुलाबी, हिरवा, राखाडी किंवा काळा यासारख्या रंगांमध्ये असतात.
- काही सुरवंट एकसमान रंगाचे असतात तर काही पट्टेदार असतात.
- काही अळ्या निस्तेज असतात आणि काही चकचकीत किंवा चमकदार दिसतात.
- सुरवंट हे अळ्यांच्या स्वरूपात असतात.
सुरवंटांची लक्षणे (Symptoms of Cutworms):
सुरवंट झेंडूच्या कोवळ्या रोपांना, पानांना, कळ्यांना, फुलांना खातात.
सुरवंटाचे व्यवस्थापन (Management of Cutworms):
- शेतातील भेगा आणि खड्ड्यांवर असलेल्या अळ्या सकाळी आणि संध्याकाळी हाताने उचलून नष्ट करा.
- उन्हाळ्याच्या महिन्यांत नांगरणी करा.
- प्रकाश सापळा लावा.
- नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन सापळे 5 एकरी लावा.
- क्लोरपायरीफॉस 20% ईसी (टाटा रॅलीस-तफाबान) 400 मिली/एकर किंवा कडुनिंब तेल 3% सारख्या कीटकनाशकांची फवारणी करा किंवा
- कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास इमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) किंवा
- थाईमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-Entokill) किंवा
- क्विनालफॉस 25% ईसी (धानुका-धनुलक्स) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या झेंडू पिकातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. झेंडू पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
थंड हवामानात हे पीक चांगले येते व फुलांचे दर्जेदार उत्पादन मिळते.
2. झेंडूचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
झेंडू लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते. जमिनीचा सामू 7 ते 7.5 पर्यंत असावा.
3. झेंडूच्या पिकातील महत्वाचे रोग?
झेंडूच्या पिकात मुळकुज व पानांवरील ठिपके हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor