तपशील
ऐका
कृषी
मटार
कृषी ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
13 Aug
Follow

वाटाणा पिकामधील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Major pests of Pea and their management)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

वर्षभर मागणी असणारे आणि चांगला भाव मिळणारे वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून, या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रात रब्बी हंगामात उत्तर व पश्चिम भागात वाटाणा हे एक महत्वाचे पिक आहे. हे पीक जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. वाटण्याचे दाणे हवाबंद करून, गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. आज आपण याच लोकप्रिय अशा वाटाणा पिकातील कीटक आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

वाटाणा पिकात कोणते कीटक आढळून येतात?

वाटाणा पिकात मावा व शेंगा पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

मावा कीटक (Aphid) :

मावा कीटकाची ओळख (Identification of Aphid):

  • मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
  • मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.

मावा कीटकाची लक्षणे (Symptoms of Aphid) :

  • हे कीटक कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात.
  • त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
  • ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोधते.
  • मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.

मावा कीटकाचे व्यवस्थापन (Management of Apid):

  • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
  • फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन)  100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
  • बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.

शेंगा पोखरणारी अळी (Pea Borer):

शेंगा पोखरणाऱ्या अळीची ओळख (Identification of Pea borer):

  • शेंगा पोखरणारी अळी हिरव्या रंगाची असते.
  • सुरवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंगांना पोखरून आत शिरते.
  • पीक कळी अवस्थेत आल्यावर शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे शेंगा धरण्याच्या अवस्थेपासूनच या किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
  • शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असल्यास मोठ्या प्रमाणात आढळतो.
  • मोठ्या अळ्या शेंगांना छीद्र करून आतील दाणे पोखरुन खातात.

शेंगा पोखरणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms of Borer):

  • अळी प्रथम शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते.
  • कळ्यांवर खाल्ल्याची चिन्हे दिसतात.
  • कोवळे फुटवे तसेच काटक्या मरगळतात.
  • शेंगांवर आत शिरल्याची आणि बाहेर पडल्याची छिद्रे विष्ठेने बंद केलेली दिसतात.
  • फळातील गर नष्ट होऊन विष्ठेने फळ भरते.

शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन (Management of Borer):

  • प्रति एकरी 20 पक्षी थांबे शेतात उभारावेत.
  • पहिली फवारणी पीक 50% फुलोरा अवस्थेत असताना करावी. यामध्ये निंबोळी अर्क 5% किंवा
  • अ‍ॅझाडीरेक्टीन 0.03% ईसी (नीमेक्स) 300 पीपीएम 650 मिली किंवा
  • क्विनॉलफॉस 25% ईसी (धानुका-धनुलक्स) 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • दुसरी फवारणी म्हणजेच पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) 100 ग्रॅम प्रति 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी किंवा
  • लम्बाडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) 100 मिली प्रति 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी किंवा
  • फ्लुबेन्डियामाइड 39.35% एससी (बायर-फेम) 60 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5% एससीची (देहात - Ataque) 60 मिली प्रति एकरी फवारणी करावी किंवा
  • स्पिनेटोरम 11.7 % एससी (डाव-डेलिगेट) 200 मिली या मध्ये स्टिकरची मात्रा 4 मिली मिसळून प्रति 200 लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्याची फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुमच्या वाटाणा पिकात वरील पैकी कोणते कीटक दिसून आले? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. वाटाणा पिकात आढळून येणाऱ्या किडी कोणत्या?

वाटाणा पिकात प्रामुख्याने मावा व शेंगा पोखरणारी अळी या किडी आढळून येतात.

2. महाराष्ट्रात वाटाणा पीक घेण्याची योग्य वेळ कोणती?

महाराष्ट्रात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुन - जुलै मध्ये तसेच थंड हवामानात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस घेणे योग्य ठरते.

3. वाटाणा पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव साधारणतः कधी होतो?

वाटाणा पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असल्यास मोठ्या प्रमाणात आढळतो.

34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor