मिरचीच्या उत्तम उत्पादनासाठी फुलधारणा अवस्थेतील व्यवस्थापन (Management at flowering stage for better production of Chilli Crop)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
बाजारात मिरच्यांना वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशामधून देखील चांगली मागणी आहे. महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड होते. महाराष्ट्रात मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. स्वाद आणि तिखटपणा यामुळे मिरचीच्या पिकाला महत्त्वाचे मसाला पिक मानले जाते. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो. आजच्या लेखात आपण आज बहुगुणी मिरची पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी फुलधारणा अवस्थेतील व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
मिरची पिकाविषयी:
- मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते.
- मिरचीच्या खरीप पिकाची लागवड जून, जुलै महिन्यामध्ये करावी. तर उन्हाळी मिरची पिकाची लागवड जानेवारी - फेब्रुवारी महिन्यामध्ये करावी.
- एकरी 80 - 100 ग्रॅम मिरचीचे बियाणे वापरावे.
- मिरची पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 20 - 30 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. तापमान कमी जास्त झाल्यास फुलगळ होऊ शकते.
- मिरची लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि मध्यम भारी जमीन अतिशय चांगली मानली जाते.
मिरचीच्या उत्तम उत्पादनासाठी वाढीच्या अवस्थेतील व्यवस्थापन:
- मिरची पिकाची वाढ ही साधारणतः पहिल्या 40 दिवसांत होते. जर वाढ योग्य होत नसेल तर, पीक वाढीच्या 15 दिवसांच्या आत NPK (IFC) 500 ग्रॅम + Big Power (IFC) 200 ग्रॅम या प्रमाणात एकरी आळवणी करावी.
- पहिल्या 15 दिवसांनंतर 30 दिवसांपर्यंत 19:19:19 (देहात न्यूट्री - NPK) 500 ग्रॅम + जिंक EDTA (देहात - न्यूट्री) 150 ग्रॅम + सुपर स्टिकर 20 मिली या प्रमाणात एकरी फवारणी करावी.
- पीक वाढीच्या 15 ते 40 दिवसांत 19:19:19 (देहात न्यूट्री - NPK) 750 ग्रॅम + स्कुबा फॉर्मुला (IFC) 150 मिली + सुपर स्टिकर 40 मिली या प्रमाणात एकरी फवारणी करावी.
मिरचीच्या उत्तम उत्पादनासाठी फुलधारणा अवस्थेतील व्यवस्थापन:
- मिरची पिकाचा फुलधारणा कालावधी हा साधारणतः 40 दिवसांनंतर सुरु होतो व 60 दिवसांपर्यंत असतो.
- पीक वाढीच्या टप्पयात पिकाची योग्य काळजी घेतल्यास फुलधारणा योग्य रित्या होते.
- मिरची पिकात फुलाचे प्रमाण वाढवून जास्त उत्पादनासाठी फुल वाढीच्या अवस्थेत जमिनीतून एकरी 24:24:00 (महाधन - नायट्रो फॉस्फेट खत) @ 75 किलो, पोटॅशिअम ऑक्साईड 60% (IPL-MOP) @50 किलो, मॅग्नेशियम सल्फेट (देहात-MgSO4) @10 किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट (महाधन) @10 किलो द्यावे. तसेच विद्राव्ये खत 12:61:00 (देहात-MAP) @1000 ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
- तसेच 40 ते 60 दिवस या कालावधीत अमिनो ऍसिड 20 ते 21% (टाटा रॅलीस-बहार) 100 ग्रॅम + नॅनो झिंक (जिओ लाईफ) 50 ग्रॅम + वेट गोल्ड (आनंद ऍग्रो) 25 मिली या प्रमाणात एकरी फवारणी करावी.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून मिरचीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या मिरची पिकात फुलधारणा अवस्थेतील व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात मिरची पिकाची लागवड कुठे होते?
मिरचीचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रात नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि उस्मानाबाद येथे घेतले जाते.
2. मिरची पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
मिरची या पिकावर मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणूजन्य पानावरील ठिपके व भुरी रोग या विषाणूजन्य रोगांचा तर, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी तसेच कोळी व मावा यासारख्या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
3. मिरची पिकावरील कोळी कीटक कसा ओळखावा?
कोळी हे कीटक अत्यंत सूक्ष्म (लांबी 1 मि.मी.) असून, चप्पट, वर्तुळाकार, लाल किंवा पिवळसर असतात.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor