तपशील
ऐका
रोग
पालक
कीटक
कृषी ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
28 Aug
Follow

पालक पिकावरील प्रमुख कीड व रोगांचे व्यवस्थापन (Management of major pests and diseases of Spinach)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

पालक हे एक लोकप्रिय भाजीपाला पीक असून, या पिकापासून कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळते. पालक हे औषधी गुणांनी युक्त असे भाजीपाला पीक असून व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन करून पालकाचे उत्पादन घेतल्यास चांगला फायदा मिळतो. पालक पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी व रोग आढळून येतात. किडी व रोगांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण पालक पिकातील प्रमुख किडींविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

पालक पिकावर आढळून येणारे कीटक:

  • मावा
  • पाने कुरतडणारी अळी
  • भुंगेरे

मावा कीटक (Aphid) :

मावा कीटकाची ओळख (Identification of Spinach Aphids):

  • मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
  • मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.

मावा कीटकाची लक्षणे (Symptoms of Aphids):

  • हे कीटक झेंडूची पाने आणि कळ्यांभोवती समूहात आढळतात.
  • हे कीटक कोवळ्या पानांमधील रस शोषून घेतात.
  • त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
  • ही कीड सोंडेद्वारे पिकातील अन्नरस शोषते.
  • मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.

मावा कीटकाचे व्यवस्थापन (Management of Aphids):

  • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
  • फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
  • बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.

पाने कुरतडणारी अळी (Leaf-chewing caterpillars):

पाने कुरतडणाऱ्या अळीची ओळख (Identification of Spinach Leaf-chewing caterpillars):

  • ही एक बहुभक्षीय कीड आहे.
  • या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशीरा पेरणी केलेल्या पिकावर होतो.
  • मादी पतंग सूरुवातीला पिकाच्या व तणांच्या पानांवर तसेच कोवळ्या शेंड्यांवर एक-एक करून किंवा समूहाने 300 ते 450 अंडी घालते.
  • अळीची लांबी 0.2 ते 1.5 इंच असते.
  • अळीचा रंग भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो.
  • अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजूने असतो.

पाने कुरतडणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms of Leaf-chewing caterpillars):

  • अळी निशाचर असून दिवसा पिकाच्या सभोवतालच्या मातीमध्ये किंवा भेगांमध्ये लपून बसते.
  • रात्री ती बाहेर पडते, जमिनीलगत रोप कातरून कोवळी पाने खाऊन उपजीविका करते.

पाने कुरतडणाऱ्या अळीचे व्यवस्थापन (Management of Leaf-chewing caterpillars):

  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करा.
  • दिवसा सिंचन करण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करा.
  • इमामेक्टिन बेंजोएट 5% एसजी (धानुका -  इ.एम. 1) 100 ग्रॅम / एकर 200 लिटरची पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • क्लोरपाइरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी (देहात - सी स्क्वेअर) 400 मिली / एकरची 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • जैव उत्पादन (Damman-Bio R 303+) 1 मिली - 1.5 मिली/लीटर फवारावे.

भुंगेरा (Beetle):

भुंगेरा किटकाची ओळख (Identification of Spinach Beetle) :

  • भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे तर अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते.
  • प्रौढ भुंगा निमुळता, नळीसारखा लांबट व गर्द निळा असतो.
  • शरीरावर हिरव्या रंगाची चमकणारी छटा असते.

भुंगेरा किटकाची लक्षणे (Symptoms of Beetle):

  • मादी भुंगेरे पानाच्या मागील बाजूस अंडी घालतात. अंड्यामधून 6 ते 7 दिवसांत छोट्या मातकट पांढरट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.
  • अळ्या पानामधील हरितद्रव्य खरवडून उपजीविका करतात. त्याच ठिकाणी 12 ते 15 दिवसांत कोषावस्थेत जातात.
  • कोष किंचित पांढरट तांबूस असतात. त्यामधून जवळपास एका आठवड्याने भुंगे बाहेर पडतात.
  • अळी आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत.
  • प्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात.
  • अळ्या पान स्वतःभोवती गुंडाळून खरवडून आतील हरित भाग खातात. त्यामुळे पानावरती समांतर पांढऱ्या रेषा उमटतात.
  • अनेक रेषा एकमेकात मिसळून त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. कालांतराने असे चट्टे तपकिरी होतात, पाने करपल्यासारखी दिसतात.

भुंगेरा किटकाचे व्यवस्थापन (Management of Beetle):

  • क्विनालफोस 25% ईसी (धानुका-धानुलक्स) 400 मिली/प्रति एकरी 200 लिटर पाणी किंवा
  • ट्रायझोफॉस 40% ईसी (प्रोटेक्ट) 250 मिली /प्रति एकरी 200 लिटर पाणी किंवा
  • लॅम्डासायहॅलोथ्रीन 5% ईसी (सिंजेन्टा-कराटे) प्रवाही) 120 मिली/प्रति एकरी 200 लिटर पाणी फवारणी करावी.

पालक पिकावर आढळून येणारे रोग:

  • मर रोग
  • पानांवरील ठिपके
  • तांबेरा
  • केवडा

मर रोग:

  • मर हा रोग गरमी मध्ये (उष्ण वातावरणात) अथवा हवेत पाण्याचे प्रमाण (आद्रता) जास्त असल्यास वाढतो.
  • मर रोग लागल्यास पालकाची पाने पिवळी पडतात, पालक पिकाची मुळे सडतात.
  • पालक पिकाची पाने पिवळी पडल्यामुळे व पालकाची मुळे सडल्यामुळे पीक मरते म्हणूनच या रोगाला मर रोग म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • मर रोग होऊ नये म्हणून पालक पिकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने एकात्मिक नियोजन करावे.
  • जस की पालक लागवड करतानाच पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
  • पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक वर्षी पीक आलटून पालटून घ्यावे.
  • शेतात स्वछता ठेवावी.
  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बेणे 0.1% बाविस्टीन (क्रिस्टल)च्या द्रावणात 2 ग्रॅम प्रति किलो नुसार बीज प्रक्रिया करावी.
  • पालक पिकात मर दिसताच कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) ४०० ग्रॅमची एकरी पालक पिका भोवती आळवणी आणि फवारणी करावी किंवा सिंचना वाटे सोडावे.

पानांवरील ठिपके (Leaf Spot):

  • हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो.
  • पिकाच्या पानावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात.
  • कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
  • आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (देहात - Dunphy) 400 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

तांबेरा रोग (Rust):

  • तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हा रोग पानांच्या खालच्या बाजूला सूक्ष्म ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो.
  • हे ठिपके हळूहळू जांभळट व थोड्या उंचावलेल्या फोडात बदलतात.
  • हे ठिपके गोल ते अंडाकृती आकाराचे असून विखुरलेले किंवा पुंजक्यांसारखे असतात.
  • तांबेरा रोगाची लक्षणे पर्णकोषावर दिसतात.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरियाची शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
  • पेरणीसाठी तांबेरा प्रतिरोधक वाणांची निवड करावी.
  • वेळेवर पेरणी करावी.
  • पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
  • तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे.

केवडा (Downy Mildew):

  • केवडा हा एक बुरशीजन्य रोग आहे ज्यामुळे पालक पिकाच्या पानांवर पिवळसर बुरशीची वाढ होते व पाने कोमेजतात.
  • केवडा रोगाचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो.
  • हा रोग पावसाच्या मदतीने निरोगी भागावर पसरून रोगाचा प्रसार करतो.
  • भौतिक गुणधर्म हरवलेल्या जमिनीमध्ये तसेच आद्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो.
  • या रोगामुळे पालक पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.
  • या रोगाला दमट वातावरण अनकूल असते.
  • या रोगामुळे ग्रस्त भाग निकामी होतो या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते.
  • या रोगाची लक्षणे पिकाच्या सर्व हिरव्या भागांवर आढळतात.
  • हिरव्या पानांवर सुरवातीस लहान तेलकट डाग पडतात.
  • पानाच्या खालील भागावर ठिपका असलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ दिसते.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम/ 200 लीटर किंवा
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल एम 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 400 ग्रॅम/ 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु पी (ड्युपॉन्ट-करझेट एम 8) 600 ग्रॅमची/ 200 लीटर पाण्यातून एकरी किंवा
  • प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (बायर-अँट्राकोल) 600 ग्रॅमची/ 200 लीटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या पालक पिकातील प्रमुख किडींचे व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पालक पिकासाठी योग्य जमीन कोणती?

पालकाचे पीक विविध प्रकारच्‍या जमिनीत घेता येते. ज्‍या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत त्या जमिनीतही पालकचे पीक चांगले येऊ शकते.

2. पालक पिकासाठी महाराष्ट्रातील योग्य हंगाम कोणता?

महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते.

3. पालक पिकात आढळून येणारे प्रमुख रोग कोणते?

पालक पिकात मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा व केवडा हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.

35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor