तपशील
ऐका
रोग
मूग
कीटक
कृषी ज्ञान
कीटक व्यवस्थापन
मूग
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
4 Apr
Follow

मुग पिकात आढळून येणाऱ्या किडी व रोगांचे व्यवस्थापन! (Management of pests and diseases found in Moong bean crops!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारतातील कडधान्य पिकांमध्ये मुगाचे विशेष स्थान आहे. मूग हे एक वार्षिक पीक आहे जे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात चांगले वाढते. हे पीक पावसाळ्यात आणि रब्बी हंगामात घेतले जाऊ शकते. मूग हे ७० ते ८० दिवसात येणारे पिक असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ या पिकाला होतो. दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी मुगाचे पिक अतिशय महत्वाचे आहे. मुगाची लागवड केल्याने जमिनीची खत शक्ती वाढते. मुगाची लागवड योग्य पद्धतीने केल्यास त्यातून चांगला नफा मिळू शकतो. मूग पिकावर वेगवेगळ्या चक्रात अनेक प्रकारचे रोग व कीटक येण्याची शक्यता असते. या रोग व कीटकांची लक्षणे योग्य वेळी ओळखून त्यावर नियंत्रण ठेवल्यास पिकाचे होणारे नुकसान टाळता येते. चला तर मग आता जाणून घेऊया मुग पिकात येणाऱ्या महत्वाच्या अशा रोग व कीटकांविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती.

मूग पिकात आढळून येणारे रोग:

  • पिवळा मोझॅक व्हायरस
  • अँथ्रॅकनोज
  • पावडरी बुरशी

मुग पिकातील पिवळा मोझॅक व्हायरस:

हा रोग यल्लो व्हेन मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होतो. या रोगाचे प्रमाण खरिपापेक्षा उन्हाळी हंगामात अधिक असते. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो.

पिवळा मोझॅक व्हायरस रोगाची लक्षणे (Symptoms):

  • रोगाची सुरवात पानांवर ठळक पिवळसर व फिकट चट्टे एकमेकांशी संलग्न झालेल्या स्वरूपात दिसते.
  • शेवटी पूर्ण झाड पिवळे पडल्याचे आढळून येते.
  • रोगट झाडास फुले व शेंगा कमी प्रमाणात लागतात.

पिवळा मोझॅक व्हायरस रोगावर उपाय (Remedy):

  • लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून टाकावी.
  • थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 5% एससी (देहात-स्लेमाईट एससी) - 400 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात - डेमाफीप) 200 ग्रॅम प्रति एकर प्रमाणात 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करावी
  • रोगप्रतिकार जातीचा वापर करावा.

मुग पिकातील अँथ्रॅकनोज:

अँथ्रॅकनोज (गंज रोग) या रोगामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होते, उत्पादनात सुमारे 20 ते 60 टक्के घट होते. 26 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आणि ढगाळ हवामान हे या रोगाचे मुख्य कारण आहे.

अँथ्रॅकनोज रोगाची लक्षणे (Symptoms):

  • अँथ्रॅकनोज बुरशी पानांवर, देठांवर आणि शेंगांवर दिसते.
  • प्रादुर्भाव झालेली पाने ही राखाडी तपकिरी होऊन त्यांच्या कडा गडद पिवळ्या दिसतात.
  • कालांतराने हे पडलेले डाग मोठे होतात. एकमेकात मिसळल्या सारखे दिसतात. त्यांचा आकार मोठा होतो. ज्याने मोठे करपलेले भाग तयार होतात. सुरुवातीच्या काळात शेंगांच्या सालीवर लहान, फिक्कट रंगाचे ठिपके दिसतात.

अँथ्रॅकनोज रोगावर उपाय (Remedy):

  • कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यू.पी (देहात-साबू) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • थायोफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी (देहात-डी-वॉल) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • कार्बेन्डाझिम 50% डबल्युपी (क्रिस्टल-बाविस्टीन) 200 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मुग पिकातील पावडरी बुरशी:

हा रोग इरीसीफी पॉलिगोनी या बुरशीमुळे होतो. दमट व कोरडे वातावरण या बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते. हवेतील आर्द्रता 80 टक्के किंवा त्याहून अधिक असल्यास पावडरी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पावडरी बुरशी रोगाचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो.

पावडरी बुरशी रोगाची लक्षणे (Symptoms):

  • फुले व शेंगा लागते वेळी पावडरी बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
  • सुरुवातीला पानांवर पांढरे ठिपके पडतात.
  • रोगाची तीव्रता जास्त असल्यास, संपूर्ण पान पांढरट दिसते.
  • पीक लवकर पक्व होऊन उत्पादनात घट येते. जास्त प्रमाणात पानगळ होते.
  • कमाल 32 अंश सेल्सिअस तापमान, आर्द्रता 85 टक्के व कोरडे हवामान रोगास अनुकूल.

पावडरी बुरशी रोगावर उपाय (Remedy):

  • हेक्साकोनाझोल 5% एससी (देहात-स्लेयमाईट एफएस) 400 मिली किंवा
  • हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% (टाटा- ताकत) 300 ग्रॅम किंवा
  • हेक्साकोनाझोल 4% + झिनेब 68% डब्ल्यू पी (Indofil - Avtar) 500 ग्रॅम किंवा
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी (देहात-ॲझिटॉप) 300 मिली किंवा
  • अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) - 200 मिलीची प्रति एकर 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी.

मूग पिकात आढळून येणारे कीटक:

  • पांढरी माशी
  • फुलकिडे
  • शेंगा पोखरणारी अळी

पांढरी माशी (White Fly):

पांढऱ्या माशीची ओळख:

  • पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
  • रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
  • या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
  • कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
  • पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.

पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms):

  • पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
  • या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
  • झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
  • या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

पांढऱ्या माशीवर उपाय (Remedy):

  • प्रति एकर शेतात 4 ते 6 पिवळे चिकट सापळे वापरा.
  • एसिटामिप्रिड 20 % एस पी (टाटा-मानिक) 100 ग्रॅम किंवा
  • एसीफेट 75% डब्ल्यूपी (टाटा-असताफ) 400 ग्रॅम किंवा
  • याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 15 ग्रॅम किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 80 ग्रॅम किंवा
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ऍसिटामिप्रिड 20% एसपी (टाटा-माणिक) 100 ग्रॅम किंवा
  • डायफेंथियुरॉन 50% डब्ल्यू पी (सिजेंटा-पेगासस) 200 ग्रॅमची 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

फुलकिडे (Thrips):

फुलकिड्यांची ओळख:

फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात त्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.

फुलकिड्यांची लक्षणे (Symptoms):

  • मिरचीवर फुलकिडे (Thrips) या कीटकांचा प्रादुर्भाव शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतो.
  • हे कीटक पानावर ओरखडे पाडतात व त्यामधून निघणारा रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात व पानांच्या कडा ह्या वरच्या बाजूला वळतात आणि बारीक होतात.
  • हे कीटक खोडातील देखील रस शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
  • या किडीचा उपद्रव पीक लहान असतानाच सुरू होतो. ते मोठे होईपर्यंत राहतो.
  • झाडाची वाढ खुंटते. झाडाला मिरच्या कमी लागतात.

फुलकिड्यांवर उपाय (Remedy):

  • या कीडीच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावावी.
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम किंवा
  • या कीडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) 400 मिली किंवा
  • ऐसफेट 50% + इमिडा 1.8% एसपी (यूपीएल-लान्सर गोल्ड) 300 ग्रॅम किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात - डेमाफीप) 200 ग्रॅम किंवा
  • फ्लॉनिकॅमिड 50% डब्ल्यूजी (यूपीएल-उलाला) 60 मिलीची 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
  • या कीटकनाशकांचा स्प्रे फुलोरा अवस्थेत घेऊ नये.

शेंगा पोखरणारी अळी (Pod borer):

शेंगा पोखरणारी अळी ओळख:

  • शेंगा पोखरणाऱ्या अळीचा रंग हिरवट पिवळसर असून, अंगावर तुरळक समांतर रेषा असतात.
  • एक मादी कोवळी पाने, कळ्या, फुले तसेच शेंगावर सरासरी 800 अंडी घालते.
  • एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांचे नुकसान करून आपली अवस्था पूर्ण करते.
  • या अळीचा जीवनक्रम 4 ते 5 आठवड्यात पूर्ण होतो.

शेंगा पोखरणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms):

  • फुलांवर, कळ्यांवर खाल्ल्याची चिन्हे दिसतात.
  • कोवळे फुटवे तसेच काटक्या मरगळतात.
  • शेंगांवर आत शिरल्याची आणि बाहेर पडल्याची छिद्रे विष्ठेने बंद केलेली दिसतात.
  • फळातील गर नष्ट होऊन विष्ठेने फळ भरते.
  • अळ्या गुलाबी रंगाच्या असुन डोके तपकिरी असते.

शेंगा पोखरणाऱ्या अळीवर उपाय (Remedy):

  • प्रति किलो बियाण्यावर 9 मिली इमिडाक्लोप्रिड 17.8% एस एल (बायर-कॉन्फिडोर)ने बीजप्रक्रिया करावी.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास इमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) किंवा थाईमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-Entokill) किंवा
  • फ्लुबेन्डियामाइड 39.35% एससी (बायर-फेम) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या मुग पिकातील कीटक व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मूग पिकावर येणारे मुख्य रोग कोणते?

मूग पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस, पावडरी बुरशी व अँथ्रॅकनोज हे प्रमुख रोग आढळून येतात.

2. फुलकिडे कसे ओळखावे?

फुलकिडे आकाराने अतिशय लहान म्हणजेच 1 मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात व फुलकिड्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो.

3. मुगाचे पीक किती दिवसात येते?

मुगाचे पीक हे 70 ते 80 दिवसात येते.

39 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor