नारळाच्या बागेतील खत व्यवस्थापन (Manure Management in Coconut Crop)
नमस्कार शेतकरी बंधू/भगिनींनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
नारळ हे बागायती पीक असून, लागवड केल्यापासून 60 ते 70 वर्षे चांगले उत्पादन देते. जातीनुसार 4 ते 5 वर्षात नारळाला फळधारणा सुरु होते. त्यानंतर मात्र नारळ झाडाला दर महिन्याला एक पान व फुलोरा येत असतो. यामध्ये हवामानाच्या विविध घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे दिवसांमध्ये फरक पडतो मात्र त्या फुलोऱ्याला फुले लागणे हे सर्वस्वी आपल्या मशागतीवर अवलंबून असते. राज्यात कोकण वगळता नारळाची स्वतंत्र बाग फारशी आढळत नाही. असे असले तरी बांधाच्या कडेने, विहीरी भोवती ,बंगल्याच्या आवारात, अंगणात नारळाची झाडे लावलेली असतात. या झाडांचे योग्य वेळी पालन पोषण होणे उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक असते. म्हणूनच आजच्या या लेखात आपण नारळाच्या बागेतील खत व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
नारळाच्या पिकाला खत व्यवस्थापन का जरुरीचे आहे (Why is fertilizer management necessary for coconut crop)?
नारळाच्या झाडाला पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात न मिळाल्यास माडाची वाढ खुंटते, उत्पादन उशिरा व कमी मिळते, फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते व फळांना तडे जातात, त्यामुळे खत व्यवस्थापन जरुरीचे आहे. नारळाच्या झाडास मुख्यत्वे नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांची आवश्यकता असते. त्याचबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्येही द्यावी लागतात. चला तर मग जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती.
नारळाला खते देण्याची वेळ (Timing of Fertilizing Coconut crop):
नारळाच्या झाडाला जातीनुरूप चार ते सहा वर्षांनी फळधारणा सुरू होते. पूर्ण वाढलेल्या झाडास दर महिन्याला एक पान व एक फुलोरा येत असतो व त्याचे हे कार्य झाडाची मर होईपर्यंत अखंडपणे चालू असते. आंबा-काजू इत्यादी पिकांप्रमाणे नारळास ठराविक हंगाम नाही, त्यामुळे शिफारस केलेली खते तीन हप्त्यांमध्ये विभागून देणे गरजेचे आहे. हे हप्ते जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये द्यावेत.
सेंद्रिय खतांचा वापर (Use of organic fertilizers):
- सेंद्रिय पद्धतीने नारळ लागवड करण्यासाठी प्रत्येक उत्पादनक्षम झाडास मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झावळ्या आणि बागेत उपलब्ध होणारे इतर वनस्पतिजन्य साहित्य यापासून तयार केलेले 50 किलो गांडूळ खत आळे पद्धतीने देण्याची शिफारस कोकण विभागासाठी करण्यात आली आहे.
- मोठ्या झाडाच्या सहा फूट त्रिज्येच्या आळ्यात धैंचा, ताग या पिकांची पेरणी केली तर 15 ते 20 किलो हिरवळीचे खत उपलब्ध होते.
- कुंपणाच्या कडेने गिरिपुष्पाची लागवड करून त्याचाही वापर करता येईल.
- नारळाच्या झावळ्या व इतर काडीकचरा यांचा उपयोग करून त्यापासून उत्तम प्रकारचे गांडूळ खत तयार करता येते. एका माडाच्या झावळीपासून वर्षाला 22 ते 25 किलो गांडूळ खत तयार करता येते. त्यापासून झाडाची एक वर्षाची खताची एक तृतीयांश गरज भागविता येते.
जून मध्ये द्यावयाची खते:
- शेणखत आणि स्फुरदाचा पूर्ण हप्ता (50 किलो शेणखत + तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट)
- 40% Nitrogen (इफको-युरीया) 330 ग्रॅम
- पोटॅश 330 ग्रॅम (महाधन-MOP)
किंवा
- दोन किलो मिश्र खत 19:19:19 (देहात न्यूट्री - NPK)
किंवा
- 2.5 किलो मिश्र खत 15ः15ः15 (ईफको - NPK)
किंवा
- पाच किलो सेंद्रिय खत (5ः10ः5)
- पाच किलो नीम पेंड
- 0.5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये
ऑक्टोबर
- 40% Nitrogen (इफको-युरीया) ३३० ग्रॅम
- पोटॅश 330 ग्रॅम (महाधन-MOP)
किंवा
- दोन किलो मिश्रखत 19ः19ः19 (देहात न्यूट्री - NPK)
किंवा
- 2.5 किलो मिश्रखत 15ः15ः15 (ईफको - NPK)
किंवा
- पाच किलो सेंद्रिय खत (5ः10ः5)
- पाच किलो नीम पेंड
- 0.5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये
फेब्रुवारी
- 40% Nitrogen (इफको-युरीया) ३३० ग्रॅम
- पोटॅश 330 ग्रॅम (महाधन-MOP)
किंवा
- दोन किलो मिश्रखत 19ः19ः19 (देहात न्यूट्री - NPK)
किंवा
- 2.5 किलो मिश्रखत 15ः15ः15 (ईफको - NPK)
किंवा
- पाच किलो सेंद्रिय खत (5ः10ः5)
- 0.5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये
टीप:
- रासायनिक खते माती परीक्षणानुसार द्यावीत. ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये सर्व खते वर दिलेल्या मात्रेप्रमाणेच द्यावीत.
- फक्त ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये, शेणखत व स्फुरद देऊ नये आणि फेब्रुवारीमध्ये निंबोळी पेंड देऊ नये.
खते कुठे द्यावीत (Where should fertilizers be applied)?
- खते देताना कुठे आणि कशी द्यावीत याचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडाच्या मुळांचा विचार करण्याची गरज आहे.
- नारळाच्या झाडाची मुळे दर वर्षी सर्वसाधारणपणे एका फुटाने वाढतात, त्यामुळे लागत्या म्हणजेच सहा वर्षांपुढच्या माडाची खाणारी मुळे खोडापासून पाच ते सहा फूट आडवी आणि साडे तीन ते चार फूट खोलीपर्यंत वाढतात. म्हणूनच या खाणाऱ्या मुळांच्या जवळ खते देणे गरजेचे आहे.
- त्याचप्रमाणे आळे पद्धतीने पहिल्या वर्षी एक फूट व पुढे दर वर्षी एक फूट वाढवून मोठ्या झाडांना सहा फुटापर्यंत खते देणे आवश्यक आहे. यासाठी पाच वर्षांवरील वयाच्या माडांना खत देताना बुंध्यापासून दीड फूट त्रिज्येचे अंतर सोडून पुढे साडेचार फूट त्रिज्येचे गोलाकार बशीसारखे आळे तयार करावे व त्यामध्ये जून महिन्यातील हप्ता द्यावा.
- तर ऑक्टोबर आणि फेब्रुवारीतील खते आळ्यामध्ये पसरून टाकावीत व टिकावाच्या साह्याने मातीत मिसळावीत.
- जर ठिबक सिंचन पद्धती वापरली असेल तर ज्या ठिकाणी ठिबकचे पाणी पडते, अशा ठिकाणी खते टाकावीत व मातीत मिसळावीत.
नारळ बागेतील पाणी व्यवस्थापन (Water Management in Coconut crop):
- पाण्याची गरज ही जमिनीचा मगदूर आणि झाडाचे वय यावर अवलंबून असते. कोकणात पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मे या कालावधीत नारळाला पाण्याची गरज असते.
- आळे पद्धतीने पाणी देताना हिवाळ्यात 160 ते 180 लिटर तर उन्हाळ्यात 200 ते 240 लिटर पाणी चार दिवसाच्या अंतराने देणे गरजेचे आहे. परंतु लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी हिवाळ्यात 30 ते 35 लिटर आणि उन्हाळ्यात 40 ते 45 लिटर पाणी आळे पद्धतीने चार दिवसांनी द्यावे. आणि हेच प्रमाण दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी आणि पुढे वरील प्रमाणे हिवाळ्यात 160 ते 180 लिटर आणि उन्हाळ्यात 200 ते 240 लिटर पाणी चार दिवसाच्या अंतराने द्यावे.
- सुरवातीपासून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असेल तर पहिल्या वर्षी हिवाळ्यात 6 ते 7 लिटर तर उन्हाळ्यात 8 ते 10 लिटर पाणी दररोज द्यावे. ते दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी हिवाळयात 30 ते 35 लिटर आणि उन्हाळ्यात 40 ते 45 लिटर पाणी दररोज द्यावे.
बागेत जलसंधारण:
- वर्षातून दोनवेळा पावसाच्या सुरवातीस आणि अखेरीस बागेची नांगरट करावी.
- प्रत्येक नारळाच्या आळ्यात उपलब्धतेनुसार सोडणाचा भुसा, हिरवा पाला, वाळलेला पालापाचोळा, गवत, नारळ झावळयांचे तुकडे यांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
- शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत, हिरवा पाला यांचा वापर करावा.
- झाडाच्या आळ्यात चर खोदून सोडणे गाडावीत. शिफारशीनुसार पालाश खतांचा वापर करावा.
तुमच्या नारळ बागेमध्ये तुम्ही कशाप्रकारे खत व्यवस्थापन केले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. नारळ लागवडीसाठी कोणते हवामान योग्य असते?
नारळ लागवडीसाठी सामान्य तापमान आणि उष्ण हवामान योग्य असते.
2. नारळ लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
वालुकामय चिकणमाती नारळ लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते.
कापूस पूर्णपणे परीपक्व झाल्यावर म्हणजेच वाणांच्या परीपक्वतेच्या कालावधीनुसार साधारणतः 145 ते 160 दिवसांत कापसाची वेचणी करवी.
3. एका नारळ झाडापासून किती वर्षे उत्पादन मिळू शकते?
नारळ हे बागायती पीक असून, एका लागवड केलेल्या झाडापासून 60 ते 70 वर्षे चांगले उत्पादन मिळू शकते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor