मटार पिकातील योग्य खत व्यवस्थापन (Manure Management in Pea Crop)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्रात वर्षभर मटार पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात रब्बी हंगामात उत्तर व पश्चिम भागात मटार हे एक महत्वाचे पिक आहे. राज्यात मटार पिकाचे उत्पादन हे बडोदे, खान्देश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मटारचे दाणे हवाबंद करून, गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. वर्षभर असणारी मागणी आणि चांगला भाव असे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. हे पीक जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. आज आपण याच लोकप्रिय अशा वाटाणा पिकातील खत व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
मटार पीक लागवडीसाठी आवश्यक जमीन व तापमान (Suitable Soil and Temperature for Peas Cultivation):
- मटार हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी, हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते.
- मटार लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.
- जमिनीचा सामू 5.5 ते 6.7 असावा.
- मटार हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी 10° ते 18° से तापमानात या पिकाची वाढ चांगली होते.
- कडाक्याची थंडी व धुके यामुळे पिकावर दुष्परिणाम होतो.
- फुले येण्याच्या वेळेस उष्ण हवामान असल्यास शेंगांमध्ये बी भरत नसल्याने मटारची प्रत कमी होते. त्यामुळे योग्य वातावरण बघून या पिकाची लागवड करावी.
पूर्वमशागत:
- मटार हे चांगले उत्पादनशील पीक असल्यामुळे त्याची पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यामुळे मुळ्या चांगल्या वाढतात आणि भरपूर अन्नद्रव्ये शोषून घेऊन झाडाची वाढ व्यवस्थित करण्यास हातभार लावतात.
- त्यासाठी उभी आडवी नांगरट करून 2-3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
- ढेकळे व्यवस्थित फोडावीत व जमीन सपाट करावी.
- पेरणीपूर्वी पाणी देणे आवश्यक समजावे.
- वापसा आल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगली होते.
लागवडीचा हंगाम (Peas Planting season):
मटार पिकाची महाराष्ट्रात खरीप हंगामात जुन - जुलै मध्ये तसेच हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस लागवड करणे हिताचे ठरते.
मटार पिकातील खत व्यवस्थापन (Fertilizer Management in Peas):
शेणखताचा वापर:
- पहिल्या नांगरणीनंतर एकरी 4 ते 6 गाड्या जुन्या शेणखताचा वापर करावा. हे वनस्पतींसाठी आवश्यक पोषण प्रदान करते आणि मातीची गुणवत्ता राखते.
- शेणखता ऐवजी कंपोस्ट खत देखील वापरता येते.
- मटार शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेततळे तयार करण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. शेतात पेरणीपूर्वी गांडूळ कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत मिसळावे जेणेकरून माती पोषक होईल.
रासायनिक खताची मात्रा:
- नत्र: 20 किलो प्रति एकर वापरावे.
- स्फुरद: 25 किलो प्रति एकर वापरावे.
- पोटॅश : पोटॅशची कमतरता असलेल्या भागात 20 किलो पालाश प्रति एकर वापरावे.
- ओलीताखाली लागवडीच्यावेळी एकरी 20:30:20 ही खत मात्रा तर 10 किलो नत्र एक महीन्याने द्यावे. एकरी तीन ते चार गाड्या चांगले कुजलेले शेणखत लागवडीपुर्वी व लागवडीनंतर विभागुन द्यावे.
- लागवडी पूर्वी 6:24:24 किलो नत्र:स्फुरदःपालाश प्रति एकरी व लागवडीनंतर एक महिन्याने 4 किलो नत्र प्रति एकरी द्यावी.
पाणी व्यवस्थापन (Peas Water Management):
- मटार पिकाच्या निरोगी वाढीसाठी योग्य सिंचन अत्यंत महत्वाचे आहे. येथे दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही मटार पिकाला योग्य प्रकारे पाणी देऊ शकता:
- उगवण आणि प्रथम सिंचन:
ओलसर जमिनीत पौष्टिकतेने रोपांची उगवण करण्यासाठी, बिया चांगल्या निचरा झालेल्या जमिनीत पेरल्या जातात. बियाणे पेरल्यानंतर लगेच पहिले सिंचन केले जाते, जेणेकरून ओलसर जमिनीत बियाणे व्यवस्थित अंकुरित होतील.
- नियमित सिंचनाची गरज:
झाडांना वेळोवेळी पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. पहिले पाणी दिल्यानंतर दुसरे पाणी 15 ते 20 दिवसांच्या अंतराने द्यावे. त्यामुळे झाडांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत राहते व झाडे निरोगी व जिवंत राहतात.
- सिंचनाचे तंत्र:
सिंचनासाठी अनेक तंत्रे असू शकतात, जसे की स्प्रिंकलर प्रणाली, ठिबक सिंचन किंवा नलिका असलेल्या विहिरी वापरणे. शेतीच्या प्रकारानुसार आणि योग्यतेनुसार योग्य सिंचन तंत्राची निवड करावी.
- हवामानाची पर्याप्तता:
हवामान आणि पावसाच्या पर्याप्तेनुसार नियमितपणे सिंचन करावे. अकस्मात येणारा पाऊस किंवा दुष्काळाच्या वेळी सिंचन व्यवस्थापन चांगले केले पाहिजे.
टीप:
- हे पीक जमिनीत नत्र स्थिरीकरण करत असल्याने नत्रयुक्त खतांची मात्रा कमी द्यावी.
- कच्चे शेण शेतात वापरले जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी. कच्च्या शेणात दीमक प्रजनन होण्याचा धोका जास्त असतो.
- खते देतांना जमिनीवर फेकून न देता झाडाच्या भोवती 8 सें.मी. अंतरावर गोलाकार आळे करून द्यावे. नत्रयुक्त खते व पालाश झाडांच्या सान्निध्यात आल्यास बियांच्या उगवणक्षमतेवर परिणाम होतो.
तुम्ही मटार पिकात कशाप्रकारे खत व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. मटार पिकात आढळून येणाऱ्या किडी कोणत्या?
मटार पिकात प्रामुख्याने मावा व शेंगा पोखरणारी अळी या किडी आढळून येतात.
2. महाराष्ट्रात मटार पीक घेण्याची योग्य वेळ कोणती?
महाराष्ट्रात मटार हे पीक खरीप हंगामात जुन - जुलै मध्ये तसेच थंड हवामानात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस घेणे योग्य ठरते.
3. मटार पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव साधारणतः कधी होतो?
मटार पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असल्यास मोठ्या प्रमाणात आढळतो.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor