मधमाशी पालनातून मिळवा अतिरिक्त उत्पन्न, सरकार देत आहे अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मधमाशी पालन योजनेची सुरुवात 2019 साली करण्यात आली. मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. महाराष्ट्र राज्यात सुमारे 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजीविका करत आहे. बाजारातील मध आणि उत्पादनाच्या वाढत्या मागणीमुळे, मधमाशी पालन हा एक फायदेशीर आणि किफायतशीर व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. मधमाशी पालनाचा पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडतो कारण परागीकरणात मधमाश्या महत्त्वाची भूमिका बजावतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. चला तर जाणून घेऊया, मधमाशी पालन योजनेविषयीची अधिक माहिती.
लाभार्थी : राज्यतील भूमिहीन आणि शेतकरी
उद्देश्य : मधुमक्षिका पालनाद्वारे राज्यातील भूमीहीन व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना पूरक उत्पादन मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अनुदान : 2 हे. जमीनधारकांना 75 टक्के आणि 2 ते 5 हे. जमीनधारकांना 65 टक्के अनुदान
मधमाशी पालनासाठी आवश्यक भांडवल : साधारणपणे एका पेटीला ६००० ते ८००० रुपये इतका खर्च सुरुवातीला येतो.
पात्रता, नियम व अटी :
-
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
-
अर्जदाराने यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य शासनाद्वारे सुरु केलेल्या मधमाशी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
-
अर्जदार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
-
अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
-
अर्जदार व्यक्तिच्या नावे अथवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असणे आवश्यक आहे.
-
लाभार्थ्यांकडे मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे.
-
घरातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
-
लाभार्थ्याने सदरचा व्यवसाय हा किमान तीन वर्षे करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
-
अर्जदाराचा 7/12 व 8 अ उतारा
-
अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
-
अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
-
मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र
-
भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी तलाठी/तहसिलदार यांच्याकडील प्रमाणपत्र
-
खरेदी समितीचे प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज प्रकिया
-
पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करून अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करावी.
-
त्यानंतर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी पूर्ण झाल्यावर, पुढील मार्गदर्शनानुसार अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता.
तुम्ही मधमाशी पालन योजनेचा लाभ घेतला आहे का? तुमची उत्तरे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
