तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Aug
Follow

'महाडीबीटी'वर मागविले फवारणी पंपांसाठी अर्ज

राज्यातील शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे वितरण करण्यासाठी 'महाडीबीटी'वर अर्ज मागविण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन, इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडली आहे.

या योजनेतून फवारणी पंपांचा पुरवठा करण्यासाठी राबविलेल्या संशयास्पद निविदांच्या विरोधात राज्य शासनाकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी गेलेल्या आहेत. त्यामुळे फवारणी पंपांचा पुरवठा तूर्त होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र आता पंप वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आल्यामुळे ठेकेदारांकडून पंपांचा पुरवठा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor