तपशील
ऐका
रोग
मिरची
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
3 Jan
Follow

मिरची पिकातील भुरी रोग व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधुंनो,

महाराष्ट्रात मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्‍हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. याच मिरचीच्या पिकास घातक ठरणाऱ्या भुरी रोगाच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

थंड आणि कोरडे वातावरण वाढीसाठी पोषक असणाऱ्या भुरी रोगाची लक्षणे:

  • भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या किंवा बुंध्याजवळील पानांवर होतो.
  • भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या पानांवर, फुलकळी तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात.
  • कालांतराने झाडाची पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

भुरी रोग व्यवस्थापन:

1. लागवडीसाठी भुरी रोगास सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करावी.

2. पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावे तसेच पिकांची फेरपालट करावी.

3. पिकास पोटॅश अन्नद्रव्य कमी पडल्यास पीक भुरी रोगाला बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.

4. प्लॉट मध्ये आद्रता टिकवून ठेवण्यासाठी शक्य असल्यास तुषार सिंचनाचा वापर करावा.

5. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा यासाठी अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस (कात्यायनी) @5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा पिकात फवारणी करावी. अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस ची बुरशी भुरी रोगाच्या बुरशीवर उपजीविका करते त्यामुळे रोग नियंत्रणास तसेच प्रतिबंधास मदत होते.

6. कीड आणि रोगांच्या विरोधी लढण्याची क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन @1 मिली प्रति लिटर तसेच कायनेटिन घटक असणारे (वेस्टकोस्ट-कीटोगार्ड) @2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी 2 वेळा फवारणी करावी

7. शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा. यामध्ये गंधक 80% @2 ग्रॅम प्रति लिटर पाणी (वेलवर्गीय पीक व उन्हाळा हंगाम वगळता), मायक्लोब्यूटानिल 10% डब्ल्यू (इंडोफील-बून) @0.5 ग्रॅम किंवा झिनेब 68% + हेक्साकोनॅझोल 4% डब्ल्यू (इंडोफील-अवतार) @2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.

वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल.

तुमच्या मिरचीच्या पिकात भुरी रोगाची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


30 Likes
1 Comment
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor