मका पिकातील तण व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. पीक कोणतेही असले तरी तण प्रमाणापेक्षा जास्त उगवल्यास उत्पादनात घट होते. इतर पिकांप्रमाणेच मका पिकातील तणांमुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते म्हणूनच तणांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.
तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबतीत स्पर्धा करण्याचा कालावधी पेरणीनंतर 15 ते 35 दिवसांपर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीत बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळते. मक्यामध्ये प्रामुख्याने अरुंद पाने असलेले तण व रुंद पाने असलेले तण आढळून येतात. चला तर आता जाणून घेऊया तण नियंत्रणाविषयी.
तण प्रतिबंध:
- मक्याच्या शेतात 2 ते 3 वेळा खुरपणी व कुदळणी करावी.
- खुरपणी आणि कुदळणी करताना लक्षात ठेवा की ते 4-5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाऊ नये.
- जास्त खुरपणी आणि कुदळणीमुळे मक्याची मुळे कापली जाऊन पिकाचे नुकसान होऊ शकते.
मका पिकासाठी उपयुक्त तणनाशक:
- ॲट्रॅझीन 50% डब्ल्यूपी (बायर - फुस्ट) हे तणनाशक तण उगवणीपूर्व आणि उगवणीनंतरचे तणनाशक म्हणून तण 2-3 पानांच्या अवस्थेत असताना हे 300 ते 400 ग्राम प्रति एकरी वापरावे.
- तसेच पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांत टोप्रामेज़ोन 33.6% एससी (बीएएसएफ-टिंजर) 30 मिली+फ्लक्स 500 ग्रॅम अथवा टेम्बोट्रियोन 420 एससी 34.4% डब्ल्यू/डब्ल्यू (बायर-लॉडीस) 115 मिली+ऍट्राझ 500 ग्रॅम एकरी यांची वाफसा अवस्थेत फवारणी करावी.
- कणीस लागण्यापूर्वी बैलांच्या सहाय्याने भर लावल्यास तण नियंत्रणा सोबतच उत्पादन वाढीसाठी देखील उपयोग होतो.
तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी:
- ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना फवारणी करू नये.
- वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणीपूर्वी फवारणी करावी. स्वच्छ पाणी वापरावे.
- जमिनीवर फवारावयाचे तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित जमिनीवर फवारावे.
- तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणांपर्यंत पोचू शकत नाही. पर्यायाने पूर्णपणे नियंत्रण होत नाही.
- उगवणीपूर्व फवारणी पेरणीदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये. उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी.
- फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही.
- फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या मकाच्या पिकातील तणांवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. आणि हो मक्याच्या पानांवरील करपा रोगाच्या नियंत्रणाविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/mPupUclMuFb हे नक्की वाचा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor