मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. याच अंतर्गत फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. आजच्या लेखात आपण याच योजनेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेअंतर्गत योजनांचा समावेश:
1. सलग शेतावर फळबाग लागवड
2. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर फळझाड लागवड
2. शेतक-यांच्या पडीक शेत जमीनीवर फळझाड लागवड
फळांचा समावेश:
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत खालीलप्रमाणे फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
-
आंब्याचे कलम, आंब्याची रोपे, चिकू, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्र, लिंबू आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
-
फळपिकांचा समावेश करुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार घनपध्दतीने लागवडीकरीता तसेच कलमे, रोपे लागवडीच्या प्रती हेक्टरी सुधारीत मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे.
-
या पिकांच्या लागवडीकरीता, रोपांची खरेदी, मजुरी व सामुग्रीसाठी तिसऱ्या वर्षापर्यंत अनुदान देण्यात येते.
-
समाविष्ठ फळपिके 59 व फुलपिके 4, औषधी वनस्पती 16 - मसाल्याची पिके 4 इत्यादी पिकांचा समावेश.
आवश्यक कागदपत्रे:
-
लाभार्थ्यांचे नाव असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉब कार्ड
-
शेतीचा 7/12
-
8-अ
-
आधारकार्ड
-
राष्ट्रीयकृत
-
बँकेचे पासबुक
-
झेरॉक्स प्रत
सदर योजने अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचे ऑनलाईन सनियंत्रण केले जाते.
लाभार्थ्यांची निवड:
-
अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती
-
दारीद्र रेषेखालील लाभार्थी
-
भु-सुधार योजनेचे लाभार्थी
-
इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
-
स्री करता असलेली कुटुंबे
-
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, 2006 खालील लाभार्थी
-
आणि उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्या नंतर कृषी कर्ज माफी व कर्ज सहाय्य योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमीनीवरील कामांना, शर्तीच्या अधिनतेने प्रधान्य देण्यात येईल.
योजनेच्या लाभासाठी क्षेत्र मर्यादा :
-
पिक परत्वे कमीत कमी 0.04 हेक्टर व जास्तीत जास्त 2.0 हेक्टर प्रति लाभार्थी.
लाभार्थींना एकुण तीन वर्षाच्या कालावधीत 50:30:20 या प्रमाणे अनुदान देण्यात येते.
टीप: अर्जासाठी आपल्या जवळील कृषी कार्यालयात संपर्क साधावा.
तुम्ही मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला आहे का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
