ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मुहूर्तावरील सौद्यात गुळाला ४३०१ दर

दिवाळीच्या मुहूर्तावर येथील शेती उत्पन्न बाजार समितीत दर वर्षी गुळाचा सौदा होतो. यंदाच्या सौद्यास सातारा, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. यंदाचा गुळाचा सौदा मे. बी. के. पाटील आणि कंपनी या अडत दुकानात झाला. तेथील सौद्यात वसंतगड (ता. कन्हाड) येथील शेतकरी सचिन अधिकराव पाटील यांच्या मुहूर्ताच्या गुळास प्रतिक्विंटलला ४३०१ रुपयांचा दर मिळाला. हा गूळ मे. ओम ट्रेडर्स आणि कंपनी यांनी खरेदी केला. सौद्यामध्ये सरासरी चार हजार रुपयांचा दर मिळाला.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
