तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'नाफेड'अंतर्गत १५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

खुल्या बाजारपेठेत सोयाबीनला अल्प दर मिळत असल्याने शासनाच्या आधारभूत किंमतीने सुरू असलेल्या नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन विकून कसाबसा उत्पादन खर्च काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. याशिवाय ज्यांना सावकार, बँकांचे कर्ज, कृषी केंद्राची उधारी, शेतमालकाचा शेतीचा मक्ता आदी व्यवहार सोयाबीनवर ठरले होते, ते शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विकून कधीचेच मोकळे झाले. उर्वरित शेतकऱ्यांनी उत्पादकता खर्चाच्या भरपाईसाठी नाफेडला सोयाबीन देण्यावर भर दिला आहे.


34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor