तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'नाफेड'साठी कांदा खरेदी बाजार समितीतूनच व्हावी


'नाफेड'ची खरेदी शंका कुशंकांच्या गर्तेत सापडली असतानाच कामातील गैरप्रकार खुद्द 'नाफेड'चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्या समोर आले आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी महासंघांच्या काही खरेदी केंद्रावर नियम डावलून काम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे 'नाफेड'च्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीवर शेतकरी नाराज असून ही खरेदी 'नाफेड'ने बाजार समितीच्या माध्यमातून करावी, अशा मागणी नाफेडचे पश्चिम विभाग संचालक केदा आहेर व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी अहिर यांच्याकडे केली आहे.

53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor