ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Apr
Follow
नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कांद्याची बाजार समित्यांबाहेर खरेदी
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, नामपूर, सटाणा, नांदगाव आदी ठिकाणी बाजार समित्यांबाहेर कांदा खरेदी झाली. मात्र यामध्ये पारदर्शकता नाही. हे लिलाव बेकायदेशीर असल्याचे सांगत बाजार समित्या व महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने यावर आक्षेप घेतला असून बाजार समित्यांच्या प्रशासनाने कारवाईची तयारी केली आहे. व्यापारी-मापारी व हमालांच्या लेव्हीच्या वादावरून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मुख्य व उपबाजार आवारांमध्ये कांदा लिलाव गेल्या 7 दिवसापासून बंद आहे. असे असताना खासगी ठिकाणी व बाजार समित्यांबाहेर कांदा खरेदीसाठी व्यापारी आग्रही आहेत. त्यानुसार ही खरेदी झाली.
58 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor