तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
13 July
Follow

नमो ड्रोन दीदी योजना, महाराष्ट्र (Namo Drone Didi Yojana, Maharashtra)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.

ग्रामीण महिलांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नमो ड्रोन दीदी योजना सुरु केली. 30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो ड्रोन दीदी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची देखभाल यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये ड्रोनद्वारे पिकांवर लक्ष ठेवणे, कीटकनाशके व खतांची फवारणी करणे, बियाणे पेरणे आदी विविध शेतीविषयक कामांसाठी महिलांना प्रशिक्षण दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयीची माहिती.

काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?

नमो ड्रोन दीदी योजना हा मोदी सरकारचा एक अभिनव प्रयत्न आहे. देशातील महिलांना सक्षम करणे आणि स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे उद्देश आहे. या योजनेंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, ड्रोनच्या डेटाचे ॲनालिसिस आणि ड्रोनची काळजी यासंबंधीचे प्रशिक्षण सरकारकडून दिले जाणार आहे.

ड्रोन शेतीचा उपयोग?

  • ड्रोन हे हवेतून उडणारं मानव विरहित वाहन आहे. ड्रोन व त्यावरील उपकरणाला जमिनीवरुन रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित केलं जाऊ शकतं.
  • ड्रोनमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, कॅमेरे यांचा समावेश असतो.
  • ड्रोनची किंमत साधारणपणे 6 ते 15 लाखांपर्यंत असते. ड्रोनचं आयुष्य 4 ते 5 वर्षांचं असतं. ड्रोन दीड ते दोन किलोमीटर लांब उडू शकतात, तर 400 फुटांपर्यंत उंच उडू शकतात.
  • ड्रोन महाग असल्यामुळे प्रत्येकच शेतकरी तो खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे ड्रोन भाडेतत्वावर घेऊन शेतीसाठी वापरणं हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.
  • शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांच्या परिश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे.
  • ड्रोनद्वारे एक हेक्टर क्षेत्रावरील फवारणी 20 ते 30 मिनिटांत पूर्ण होते. ट्रॅक्टर अथवा माणसानं स्वत: फवारणी करायची म्हटलं तर यापेक्षा अधिक वेळ लागतो.
  • याशिवाय, विषबाधा होऊन जीव दगावण्याची शक्यता असते. ड्रोनच्या वापरामुळे जीवितहानीची शक्यता नसते.
  • मजूर टंचाईवर उपाय म्हणूनही ड्रोन शेतीकडे आश्वासक नजरेनं पाहिलं जात आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेच्या निवडीसाठी पात्रता निकष (Namo Drone Didi Yojana - Eligibility) :

  • ड्रोन दीदी योजनेअंतर्गत देशातील 15,000 पेक्षा जास्त महिला बचत गटांच्या सदस्यांना ड्रोन दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वयं-सहायता गटांच्या सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. यासोबतच महिलेने भारतीय नागरिक असणेही आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 37 वर्षे दरम्यान असावे.

आर्थिक मदत:

  • ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, ड्रोन आणि त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80% किंवा जास्तीस्त जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.
  • ड्रोनचा वापर आर्थिकदृष्ट्या जिथं शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केली जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण 15 हजार बचत गटांना ड्रोन पुरवले जातील.

ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Namo Drone Didi Yojana - Important Documents) :

  • आधार कार्ड
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • फोन नंबर
  • ई - मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बचत गट ओळखपत्र

पीएम ड्रोन दीदी योजनेचे लाभ (Namo Drone Didi Yojana - Advantages) :

  • फक्त बचत गटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • योजनेअंतर्गत निवडलेल्या महिलांना 15 दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • ड्रोन दीदी म्हणून काम करणाऱ्या महिलेला 15 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
  • 10 ते 15 गावांचे क्लस्टर तयार करून महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांचे वेतन डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल.

नमो ड्रोन दीदी योजनेचे फायदे (Namo Drone Didi Yojana - Benefits) :

  • महिलांना नवीन रोजगार मिळेल.
  • बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर बनवते.
  • ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण मिळेल.
  • सर्व महिलांना ₹ 15000 पर्यंत मासिक वेतन मिळते.
  • महिलांना नेतृत्व क्षमतेत समानता मिळेल.
  • गावांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या हातांना काम मिळेल.
  • ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन आणि अधिक आत्मविश्वास मिळेल.

तुम्हीनमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. नमो ड्रोन दीदी योजना केव्हा सुरु करण्यात आली?

30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो ड्रोन दीदी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

2. नमो ड्रोन दीदी योजनेचे उद्देश काय?

ग्रामीण महिलांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नमो ड्रोन दीदी योजना सुरु केली.

3. नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत महिलांना कशाचे प्रशिक्षण दिले जाते?

नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, ड्रोनच्या डेटाचे ॲनालिसिस आणि ड्रोनची काळजी यासंबंधीचे प्रशिक्षण सरकारकडून दिले जाते.

43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor