तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Feb
Follow

नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीतही कांदा लागवड

नगर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचे क्षेत्र कमी झाले असले तरी कांदा लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागात पाणी उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्र वाढीला मदत होत आहे. यंदाही दोन हेक्टरच्या जवळपास कांदा लागवड होण्याचा अंदाज असून, आतापर्यंत 1 लाख 70 हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. यंदा पुरेसा दर नाही, नैसर्गिक वातावरणामुळे नुकसान होत असूनही शेतकऱ्यांचा कल कांदा उत्पादनाकडेच आहे.


37 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor