तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 June
Follow

निवडणुकीनंतर उन्हाळ कांद्याला दराचा टेकू

गेल्या दीड वर्षात केंद्र सरकारचे ग्राहकधार्जिणे धोरण व केलेल्या हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादकांचे अर्थकारण अडचणीत आले. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यांपर्यंत उत्पादन खर्चही निघाला नव्हता. तर चालू वर्षीही निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्यामुळे दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिलासा मिळेल व दरवाढ होईल या आशेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार आवारात आवक नियंत्रित केली. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने मे महिन्यापासून दरात सुधारणा दिसून आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात चालू जून महिन्यात कांद्याने प्रथमच प्रतिक्विंटल २ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.


57 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor