तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

‘नमो’चा दुसरा हप्ता लवकरच मिळणार

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 1792 कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे. मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते. एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांचा पहिला तर ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांचा दुसरा हप्ता देण्यात येणार होता. मात्र आता तीन महिने उशिराने दुसरा हप्ता देण्यात येणार आहे.


48 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor